टोकण पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीनला शेकडो शेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST2021-09-14T04:24:01+5:302021-09-14T04:24:01+5:30

नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेतीत प्रगती करण्यासाठी तरुणवर्ग शेतीकडे आकर्षित होत आहे. येथील तरुण शेतकरी मनोज विनायकराव पाटील यांनी आपल्या ...

Hundreds of legumes token soybeans | टोकण पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीनला शेकडो शेंगा

टोकण पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीनला शेकडो शेंगा

नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेतीत प्रगती करण्यासाठी तरुणवर्ग शेतीकडे आकर्षित होत आहे. येथील तरुण शेतकरी मनोज विनायकराव पाटील यांनी आपल्या शेतीत टोकण पद्धतीने सोयाबीन पीक घेण्याचे ठरवले. शेतीविषयी माहिती असलेल्या जाणकार शेतकऱ्यांशी संपर्क साधला. कृषी विभागाने आयोजित केलेल्या सर्व सोयाबीन सेमिनारमध्ये उपस्थिती नोंदवून माहिती संकलित केली. त्या सर्व माहितीच्या आधारे यावर्षी गावात प्रथमच सोयाबीनची टोकण पद्धतीने लागवड केली. दोन सरीतील अंतर साडेतीन फूट व दोन बियाणांतील अंतर नऊ इंच ठेवले. यासाठी त्यांना १५ किलो ५०० ग्रॅम बियाणे लागले. सुरुवातीलाच ठिबक सिंचन संचाने पाणी दिले. योग्यवेळी फवारणी केली. सद्य:स्थितीत एका सोयाबीनच्या झाडास तीनशेपेक्षा अधिक शेंगांची लागण झाली आहे. हे सोयाबीन पाहण्यासाठी गावातील सर्व शेतकरी येत आहेत. शेतीत तोटा नसून पारंपरिक पद्धतीने शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नवनवीन तंत्रज्ञान, बी-बियाणे यांचा वापर करावा हेच या प्रयोगातून सिद्ध होत आहे. या सोयाबीन शेतीस उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, कृषी सहाय्यक पंढरी माचे यांनी भेट देत पाहणी केली.

Web Title: Hundreds of legumes token soybeans