शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी लोप पावत आहे ! अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी नागरिकांनी टेम्पोतील शीतपेय हातोहात लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 17:26 IST

शीतपेयांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि एका मालट्रकचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटीनजिक घडली़ यावेळी अपघातग्रस्त टेम्पोतील शीतपेयांच्या बाटल्या व अन्य साहित्य नागरिकांनी हातोहात लांबविले़

चाकूर ( लातूर ) : शीतपेयांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि एका मालट्रकचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटीनजिक घडली़ यावेळी अपघातग्रस्त टेम्पोतील शीतपेयांच्या बाटल्या व अन्य साहित्य नागरिकांनी हातोहात लांबविले़. मदतीला धावून जाण्याऐवजी नागरिक शीतपेयांचे बॉक्स पळविण्यासाठी धावाधाव करीत असल्याने माणुसकी कशी लोप पावत चालली, याचाच यावेळी प्रत्यय आला.

सोलापूर येथून शीतपेय घेऊन चाकूरकडे येणारा टेंम्पो ( एमएम १३ एएक्स ९२९८) हा नांदगाव पाटी नजीक आला तेव्हा समोरून चाकूरकडून लातूरकडे जाणारी मालट्रक ( एमपी २० एबी ५४८५) यांच्यात धडक झाली.  टेम्पोचे मागचे टायर फूटून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे़  हा अपघात होताच टेंम्पोतील शीतपेय व रंगाच्या डब्ब्याचा सडाच रस्त्यावर पडला. 

रस्ता रंगून गेला

अपघाताची माहिती मिळताच या परिसरातील व रस्त्यावरील लोकांनी शीतपेयाचे कार्टून उचलून घेण्यासाठी एकच गर्दी केली. परिणामी, काही वेळेसाठी वाहतूकीची कोंडी झाली. शीतपेयांच्या बाटल्याबरोबरच रंगाचे डब्बे ही नागरिकांनी उचलून नेले. टेम्पो पलटल्याने त्यातील साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले. यातच रंगाचे डबे फुटल्याने संपूर्ण रस्ताच रंगला होता. अपघातात टेम्पो आणि मालट्रक या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून टेम्पोचा चालक जखमी झाला आहे. याबाबत चाकूर पोलिस ठाण्यात सायंकाळपर्यंत कोणतीही तक्रार देण्यात आली नव्हती़ 

अशी वाढली धावपऴ़अपघातानंतर टेम्पोतील शीतपेय रस्त्यावर पडले़ टेम्पातून शीतपेयांचे बॉक्स खाली पडल्याचे पाहून मदतीसाठी धावून जाण्याऐवजी अनेक नागरिकांनी बॉक्स उचलून पळविण्याचा सपाटा लावला़ बघता बघता संपूर्ण टेम्पो रिकामा झाला़ यात रस्त्याने निघालेल्या अनेक वाहनधारकांनीही हात धुवून घेतला़ अपघातानंतर मदत करण्याऐवजी नागरिक साहित्य घेऊन पळाले़ एकजण जखमी झाल्याने त्याची फारसी चर्चा झाली नाही़ मात्र, साहित्य पळविण्यासाठी नागरिकांची वाढलेली धावपळ पाहून सुजाण नागरिकांनी लोकांच्या वृत्तीवर सवाल उपस्थित केला आहे़

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूरhighwayमहामार्गtheftचोरी