दुचाकी चोऱ्या कशा रोखणार; जिल्ह्यात पाच ठिकाणांहून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST2021-08-21T04:24:17+5:302021-08-21T04:24:17+5:30
उदगीर शहरातील एका रुग्णालयासमोर पार्किंग केलेल्या एम.एच.२४ एम. ३०४५ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. फिर्यादी जावेद खाजासाब ...

दुचाकी चोऱ्या कशा रोखणार; जिल्ह्यात पाच ठिकाणांहून दुचाकी लंपास
उदगीर शहरातील एका रुग्णालयासमोर पार्किंग केलेल्या एम.एच.२४ एम. ३०४५ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. फिर्यादी जावेद खाजासाब चाऊस यांनी वडिलांना दवाखान्यात ॲडमिट केले व त्यानंतर बाहेरून दुचाकी पाहिली असता ती जागेवर दिसून आली नाही.अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याबाबत जावेद खाजासाब चाऊस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना सगर करीत आहेत.
लातूर शहरातील मेजवानी हॉटेलसमोर पार्किंग केलेल्या एम.एच. २४ ए. एन.९४५५ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली. याबाबत दिनकर रावसाहेब ढोबळे (रा.पानचिंचोली, ता. निलंगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गोसावी करीत आहेत.
गंजगोलाई परिसरातील मिरची लाईन येते पार्किंग केलेल्या एम.एच.२४.ए.सी. ३४५२ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली.याबाबत अजय अनिल पवार(रा. सम्राट चौक, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उदगीर शहरातील चौबारा रोडवर पार्किंग केलेल्या के. ए. ३२ जे.२५९९ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली. दुचाकी घरासमोर पार्किंग केली होती. याबाबत अनुप अशोक अंबेसंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ पुट्टेवाड करीत आहेत.
लातूर शहरातील बरकत नगर येथे घरासमोर पार्किंग केलेल्या एम.एच. २४ ए. ई.७५३० या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत आसिफ पाशा वसिमसाब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुरुळे करीत आहेत.