कुरापत काढून काेयत्याने माहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:11+5:302021-08-19T04:25:11+5:30

क्षुल्लक कारणावरून तिघांना केली मारहाण लातूर : क्षुल्लक कारणावरून तिघांना मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदपूर परिसरात ९ ऑगस्ट राेजी ...

How to get rid of bad habits | कुरापत काढून काेयत्याने माहरण

कुरापत काढून काेयत्याने माहरण

क्षुल्लक कारणावरून तिघांना केली मारहाण

लातूर : क्षुल्लक कारणावरून तिघांना मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदपूर परिसरात ९ ऑगस्ट राेजी घडली. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात चारजणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले की, फिर्यादी अनिल संभाजी तिगाेटे (वय २३, रा. अहमदपूर) हा शाम सटवा ससाने याच्यासह अन्य तिघांना तुम्ही माझ्या भावास विनाकारण शिवीगाळ करून भांडण, तक्रारी का केलात ,असा जाब विचारला असता, चाैघांनी संगनमत करून मारहाण केली. शिवाय, आई, चुलती भांडण साेडविण्यासाठी मध्यस्थी करत असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली. याबाबत अहमदपूर पाेलीस ठाण्यात चार जणांविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साराेळा शिवारातून दुचाकी पळविली

लातूर : एका चहाच्या हाॅटेलसमाेर थांबविण्यात आलेली माेटारसायकल अज्ञात चाेरट्यांनी पळविल्याची घटना औसा तालुक्यातील साेराेळा शिवारात ७ ते ८ ऑगस्टदरम्यान घडली. याबाबत औसा पाेलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी राजेंद्र डिगंबर स्वामी (वय ४३, रा. महादेववाडी, ता. औसा) यांनी आपल्या ताब्यातील माेटारसायकल एम.एच. १२ एच.जी. १५९५ एका हाॅटेलसमाेर थांबविली हाेती. ती अज्ञात चाेरट्यांनी पळविली. शाेधाशाेध घेतली असता ती आढळून आली नाही. याबाबत औसा पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविराेधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतीच्या कारणावरून दाेघांना मारहाण

लातूर : शेतीच्या कारणावरून कुरापत काढून दाेघांना तिघांनी संगनमत करून मारहाण केल्याची घटना औसा तालुक्यातील किनीनवरे शिवारात १५ ऑगस्ट राेजी घडली. याबाबत किल्लारी पाेलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले की, फिर्यादी सुधाकर दामाेदर शिंदे (वय ३८, रा. किनी नवरे, ता. औसा) यांच्यासह त्यांच्या पत्नीला शेतीच्या कारणावरून लिंबराज शिंदे याच्यासह अन्य दाेघांनी लाेखंडी पाईपने पायावर, मांडीवर, खुब्यावर मारून जखमी केले. शिवाय, जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत किल्लारी पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तिघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेहकाॅ. उस्तुर्गे करीत आहेत.

रहदारीला अडथळा, वाहनधारकावर गुन्हा

लातूर : चालकाने आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन निटूर येथील चाैकात थांबून रहदारीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पाेलीस ठाण्यात एका वाहनधारकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले, वाहनधारकाने आपल्या ताब्यातील वाहन एम.एच. २४ ए.यू. ०२६९ निटूर येथील भर चाैकात थांबविले हाेते. दरम्यान, स्वत:सह इतरांच्या जिवितास धाेका निर्माण हाेइल, अशा स्थितीत वाहन थांबविल्याचे आढळून आले. याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलीस ठाण्यात पाेहेकाॅ. सत्यवान कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणप्रकरणी दाेघांविराेधात गुन्हा

लातूर : क्षुल्लक कारणावरून एका तरुणाच्या हातावर, पायावर आणि गुडघ्यावर शितपेयाची बाटली मारून जखमी केल्याची घटना कव्हाराेड, माताजी नगरात मंगळवारी घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी नितीन भीमराव ताेरकडे, वय २५, रा. कव्हा राेड, माताजी नगर, लातूर याला सचिन अशाेक माने याच्यासह अन्य एकाने संगनमत करुन पानटपरीवरील शितपेयाच्या बाटलीने मारहाण केली. यावेळी फिर्यादी हा तावडीतून निसटून जात असताना, दुसऱ्याने पकडून मारहाण केली. शिवाय, जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस नाइक जाधव करीत आहेत.

Web Title: How to get rid of bad habits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.