शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्या करणाऱ्या दाेन, सराईत गुन्हेगारांना अटक; चार वाहनांसह दागिने जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: July 22, 2023 21:12 IST

अधिक चाैकशी केली असता, चार गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दींत घरफाेड्या करणाऱ्या टाेळीतील दाेघा सराईत गुन्हेगारांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून कारसह चार चारचाकी वाहनासह साेन्या-चांदीचे दागिने असा दोन लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक चाैकशी केली असता, चार गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूरसह जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांत वाढ झाली असून, या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले. त्यानुसार अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या पथकाने जिल्ह्यातील घरफोड्यांची माहिती संकलित केली. संशयित आरोपींनी चोरलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह कारमधून लातुरात फिरत असल्याची माहिती खबऱ्याने दिले.या माहितीनुसार रेकॉर्डवर असलेल्या राम दगडू गर्गेवाड (वय २६), आकाश ऊर्फ भावड्या बाबूराव कांबळे (२४, दाेघे रा. मळवटी रोड, लातूर) यांना ताब्यात घेतले. अधिक चाैकशी करत झाडाझडती घेतली असता, ताब्यातील दाेघांनी इतर दाेघा साथीदाराच्या मदतीने एमआयडीसी, औसा, भादा, देवणी, चाकूर आणि उदगीरात घरफोड्या केल्याची कबुली दिली. घरफोडीत चोरलेल्या सोन्या-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार असा दोन लाख ६८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींनी चाकूर आणि उदगीर परिसरांतही चोऱ्या केल्याची कबुली दिली. चाैकशीमध्ये इतर गुन्ह्यांचा उलगडा हाेण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहायक फौजदार संजय भोसले, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, प्रकाश भोसले, रामहरी भोसले, योगेश गायकवाड, मनोज खोसे, राहुल कांबळे यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरPoliceपोलिस