निराधार योजनेतील लाभार्थ्यांना घरपाेच अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST2021-05-28T04:15:34+5:302021-05-28T04:15:34+5:30
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील निराधार, संगायो, इंगायो, श्रावणबाळ, अंपग, विधवा, परित्यक्त्या आदी योजनेतून जवळपास अडीच हजार नागरिकांना अनुदानाचा लाभ दिला ...

निराधार योजनेतील लाभार्थ्यांना घरपाेच अनुदान
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील निराधार, संगायो, इंगायो, श्रावणबाळ, अंपग, विधवा, परित्यक्त्या आदी योजनेतून जवळपास अडीच हजार नागरिकांना अनुदानाचा लाभ दिला जातो. त्यामुळे बँकेत अनुदानाची रक्कम जमा झाली की आठवडाभर बँकेसमोर रांगा लागतात. अनुदान उचलण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. परंतु अद्यापि कोरोना संसर्गाचा धोका टळलेला नसल्याने जिल्हा बँकेच्या वरिष्ठांकडून निराधारांना स्थानिक निराधार कमिटी सदस्यांच्या माध्यमातून अनुदानाचा घरपोच लाभ देण्यात यावा. अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार तालुका मुख्य शाखेत तालुक्यातील आठ शाखेच्या व्यवस्थापक, कर्मचारी यांची वरिष्ठांच्या उपस्थितीत बैठक घेऊन बँकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी अनुदानाचा घरपोच लाभ देण्यात यावा याबाबत माहिती दिली. त्यानुसार उजेड, दैठणा, तळेगाव दे. शाखेने अंमलबजावणी केली. त्यानुसार उजेड येथे संगायो समितीचे संजय बिराजदार यांच्या उपस्थितीत तर दैठणा, शेंद येथे सदस्य विठ्ठल पाटील, बँकेचे व्यवस्थापक जाधव, सरपंच लक्ष्मीबाई बिरादार, आशिष बिरादार, शेंदच्या सरपंच वैशाली माने, देवा माने यांच्या उपस्थितीत निराधारांना अनुदानाचे वितरण करण्यात आले.
सर्व लाभार्थींना मदत घरपोच देणार....
तालुक्यातील जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्वच निराधार लाभार्थींना अनुदानाचा घरपोच लाभ देण्यात येणार असून, निराधारांनी अनुदानासाठी बँकेसमोर रांगा लावण्याची गरज नसल्याचे यावेळी निराधार कमिटीचे सदस्य विठ्ठल पाटील यांनी सांगितले.