मुरुडमध्ये भरदिवसा घरफाेडी, अडीच लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST2021-08-22T04:23:52+5:302021-08-22T04:23:52+5:30
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी नारायण अर्जुन पाटील वय ५२ रा. आरणी ता. जि. उस्मानाबाद ह. मु. संभाजीनगर, मुरुड ता. जि. ...

मुरुडमध्ये भरदिवसा घरफाेडी, अडीच लाखांचा ऐवज लंपास
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी नारायण अर्जुन पाटील वय ५२ रा. आरणी ता. जि. उस्मानाबाद ह. मु. संभाजीनगर, मुरुड ता. जि. लातूर हे पत्नीच्या पाेटात दुखत असल्याने तिला घेऊन शासकीय दवाखाना मुरुड येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास गेले हाेते. दरम्यान, बंद असलेल्या घराचे कुलूप ताेडून अज्ञात चाेरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूममध्ये असलेले कपाट फाेडून आत ठेवण्यात आलेल्या ४ ताेळे वजनाच्या साेन्याच्या बांगड्या, ५ ग्रॅम वजनाच्या ५ अंगठ्या, ४ ग्रॅम वजनाच्या २ अंगठ्या असा जवळपास एकूण २ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरट्यांनी लंपास केला. घटनास्थळी मुरुड पाेलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. अलीकडे लातूर शहरासह जिल्ह्यात माेटारसायकल चाेरी, घरफाेडीच्या घटनात माेठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
याबाबत मुरुड पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चाेरट्यांविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पाेलीस निरीक्षक ढाेणे करीत आहेत.