ताण कमी करण्यासाठी खाकीतही जोपासला जातोय छंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:20 IST2021-05-09T04:20:07+5:302021-05-09T04:20:07+5:30

सादरीकरणातून आनंद... बासरी वादनाची आवड निर्माण झाल्याने दररोज सकाळी सराव करतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे मनोरंजन होते. ड्युटीसोबतच छंद जोपासता ...

Hobby is also practiced in khaki to reduce stress! | ताण कमी करण्यासाठी खाकीतही जोपासला जातोय छंद !

ताण कमी करण्यासाठी खाकीतही जोपासला जातोय छंद !

सादरीकरणातून आनंद...

बासरी वादनाची आवड निर्माण झाल्याने दररोज सकाळी सराव करतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे मनोरंजन होते. ड्युटीसोबतच छंद जोपासता येतोय, याचे समाधान आहे. मागील काही वर्षांपासून बासरीवादनाचा छंद जोपासत असल्याचे विवेकानंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शंकर मोरे यांनी सांगितले.

निसर्गाच्या सानिध्यात फोटोग्राफी...

२००८ पासून फोटोग्राफीबद्दल आकर्षण निर्माण झाले. प्रारंभी छोट्या कॅमेऱ्याद्वारे छंद जोपासला. २०१३ पासून ड्युटीसोबतच निसर्गातील नावीन्यपूर्ण फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. त्यातून मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त ठेवण्यास मदत झाली. आतापर्यंत राज्यस्तरावर चार पारितोषिक मिळाली असून, देश पातळीवरील पोलीस स्पर्धेसाठी निवड झाली असल्याचे पोलीस कर्मचारी धनंजय गुट्टे यांनी सांगितले.

दररोज गायनाचा सराव...

लहानपणापासून गायनाची आवड. त्यातच घरी परमार्थिक वातावरण असल्याने भजन, अभंग, भक्तिगीते गायनाची सवय झाली. महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांत सहभागी होत गायनाचा छंद जोपासला. सध्या ड्युटीसोबतच मिळणाऱ्या वेळेत गायनाचा सराव करीत असल्याचे पोलीस कर्मचारी सागर झुंजे यांनी सांगितले.

व्हॉलीबॉलद्वारे मिळाली ओळख...

१९९५ पासून व्हॉलीबॉल खेळाकडे आकर्षित झालो. त्या माध्यमातून राज्य, देशपातळीवरील स्पर्धेत सहभागी होता आले. पोलीस विभागाच्या राष्ट्रीय स्पर्धेतही आठ वेळेस क्रीडा नैपुण्य दाखविता आले. सध्या कोरोनाच्या या काळात सेवेसोबतच घरच्या घरी मिळणाऱ्या वेळेत हॉलीबॉलचा छंद जोपासत असल्याचे पोलीस कर्मचारी रामलिंग शिंदे यांनी सांगितले.

पोलीस दलातील कर्मचारी - १८३५

स्त्री - २३४

पुरुष - १६०१

पोलीस दलातील अधिकारी - १०९

स्त्री - ०८

पुरुष - १०१

Web Title: Hobby is also practiced in khaki to reduce stress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.