१३९ जणांची कोरोनावर मात
दरम्यान, गुरुवारी १३९ जणांनी कोरोनावर मात केली. यात होमआयसोलेशनमधील ११५, तोंडार पाटी कोविड सेंटमधील ४, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ११, मरशिवणी कोविड केअर सेंटरमधील ३, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथील २ आणि खाजगी रुग्णालयातील ४ अशा एकूण १३९ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने सुटी देण्यात आली.
रिकव्हरी रेट घसरला
आतापर्यंत २९ हजार ८३५ रुग्णांमधील २६ हजार ३० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून रिकव्हरी रेट कमी झाला आहे. सध्या ८७.२५ टक्के रिकव्हरी रेट आहे. नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरावा, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, वारंवार हात धुवावा, गरज पडली तरच घराबाहेर पडावे, गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य प्रशानाच्या वतीने करण्यात आले आहे.