रेणापूर तालुक्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST2021-08-23T04:22:56+5:302021-08-23T04:22:56+5:30
बऱ्याच दिवसांपासून रेणापूर तालुक्यांमध्ये पावसाने दडी दिली होती. त्यामुळे जोमात आलेली पिके कोमेजून गेली होती. चार दिवसांपूर्वी मध्यम स्वरूपाच्या ...

रेणापूर तालुक्यात दमदार पाऊस
बऱ्याच दिवसांपासून रेणापूर तालुक्यांमध्ये पावसाने दडी दिली होती. त्यामुळे जोमात आलेली पिके कोमेजून गेली होती. चार दिवसांपूर्वी मध्यम स्वरूपाच्या दोन दिवस झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले होते. शनिवारी रात्री साडेआठ वाजल्यापासून साडेदहा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस रेणापूरसह तालुक्यात पडला. शनिवारी रात्री झालेला हा सर्वाधिक पाऊस रेणापूर महसूल मंडळात १५० मिलिमीटर तर सर्वांत कमी पानगाव मंडळात ६३ मिलिमीटर झाला आहे. पळशी मंडळात ७२ मिलिमीटर, पोहरेगाव मंडळात ६९ मिलिमीटर, कारेपूर मंडळात ६६ मिलिमीटर असा एकूण पाच महसूल मंडळांमध्ये सरासरी ८४ मि.मीटर पावसाची महसूल मंडळात नोंद झाली आहे. या पावसामुळे पिकांना मोठा फायदा झाला असून मोठ्या पावसामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात ही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. रेणापूर तालुक्यात १०५ टक्के पेरणी झाली आहे. त्यात ४२ हजार ७०० क्षेत्रावर सर्वाधिक सोयाबीनचा पेरा झाला आहे. त्यापाठोपाठ खरीप ज्वारी, तूर, मका, उडिद, कारळ यासह अन्य पिकांचा समावेश आहे. जवळपास ४७ हजार २५१ हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी झाली आहे
रेणापूर मंडळात सर्वाधिक पाऊस...
रेणापूर महसूल मंडळात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात १५० मि.मी. पाऊस झाला आहे. मागील चार वर्षांतील ही उच्चांकी नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे. सोयाबीनला शेंगा लागल्या असून पिकाला पावसाची नितांत गरज होती. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. रविवारी दिवसभर उष्णता वाढल्याचे चित्र होते.