तंदुरुस्त मन, शरीरासाठी ध्यान, प्राणायाम शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST2021-05-30T04:17:36+5:302021-05-30T04:17:36+5:30
कोरोनामुळे मनात असलेली भीती आणि चिंता दूर करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिराचा फायदा होत असल्याचे डॉ. संगिता सौंदळे, प्राचार्य ...

तंदुरुस्त मन, शरीरासाठी ध्यान, प्राणायाम शिबिर
कोरोनामुळे मनात असलेली भीती आणि चिंता दूर करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिराचा फायदा होत असल्याचे डॉ. संगिता सौंदळे, प्राचार्य उषा कुलकर्णी यांनी सांगितले. या शिबिरामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरीर हलके वाटणे, मनातील भीती दूर होणे, आत्मविश्वास वाढणे, कोरोनामुळे निर्माण झालेला ताणतणाव दूर होण्यास मदत होत आहे. तसेच कोरोनामुक्त झालेल्यांनाही शिबिराचा फायदा होत आहे.
शिबिरात शालिवाहन अनारगट्टे, डॉ. संगीता सौंदळे, डॉ. दिलीप सौंदळे, प्रा. शंकर मठपती, शिल्पा मठपती, डॉ. रमेशचंद्र तिवारी, प्राचार्य उषा कुलकर्णी, डाॅ आनंद आष्टुरे, डाॅ. अस्मिता आष्टुरे, प्रा. राजेश शिरशीकर, श्रेया शिकशीकर, राजू मोरे, प्रा. संदीप तोडकर, गणेश बेळकट्टे, मनोज हिंगणे, स्वप्नील चामले, मधुश्री घाटगे, व्यंकट लोणीकर, रचना उळागड्डे आदी प्रशिक्षण देत आहेत. यशस्वीतेसाठी अक्षय शेळके, निखिल तोंडारे, विजय माळवदकर आदी पुढाकार घेत आहेत.