हरंगुळ जि. प. शाळेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST2021-06-18T04:14:39+5:302021-06-18T04:14:39+5:30
साकेब उस्मानी यांचा लातुरात सत्कार लातूर : आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब अब्दुल हकिम उस्मानी यांना स्वारातीम विद्यापीठाने एम.फिल प्रदान ...

हरंगुळ जि. प. शाळेची पाहणी
साकेब उस्मानी यांचा लातुरात सत्कार
लातूर : आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब अब्दुल हकिम उस्मानी यांना स्वारातीम विद्यापीठाने एम.फिल प्रदान केली आहे. याबद्दल त्यांचा लातूर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी निर्माण संस्थेचे अध्यक्ष अजहर सय्यद, सलिम सय्यद, अब्दुल समद शेख, कदीर मणियार, खलिल शेख, अहमद शेख आदींची उपस्थिती होती. साकेब उस्मानी यांच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे.
अन्सार नगर येथे वृक्षारोपण मोहीम
लातूर : शहरातील अन्सार नगर, मौलाना मोहम्मद अली रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ॲड. आर.झेड. हाशमी, सलिम सय्यद, इलियास सय्यद, कदीर मणियार, अब्दुल अहद, खलिल शेख, मन्सूर शेख आदींची उपस्थिती होती. यावेळी वृक्ष लागवड करून संगोपनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली.
रक्तदान शिबिरात ५४ जणांचा सहभाग
लातूर : माझं लातूर कोविड मदत केंद्राच्या वतीने बुधवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ५४ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सतीश तांदळे, विजय स्वामी, एजाज शेख, बाबूराव खंदाडे, काशिनाथअप्पा बळवंते, महेश पिंपळे, प्रशांत मुसळे, सुवर्णा मिरजकर, सोमेश स्वामी, मीनाक्षी स्वामी, ज्योती तांदळे, गोपाळ जडे, तेजस चिकटे, राणीताई देशपांडे, नेहा भिसे, सागर भिसे, दीपक बाचे यांची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी अभय मिरजकर, ॲड. बळवंत जाधव, ॲड. प्रदीप मोरे, गोपाळ झंवर, दीपरत्न निलंगेकर, राहुल मातोडकर, रवी पिचारे, डॉ. सितम सोनवणे, राजेश तांदळे, रत्नाकर निलंगेकर, जुगलकिशोर तोष्णीवाल, काकासाहेब शिंदे, उमेश सांगळे, अजय वाघमारे, दीपक मिरकले, संजय स्वामी आदींची उपस्थिती होती.