हाळी, हंडरगुळीत किरकोळ बाचाबाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:23 IST2021-01-16T04:23:03+5:302021-01-16T04:23:03+5:30
सकाळी साडेसात वाजता दोन्ही गावांत मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीला मतदारांची गर्दी नव्हती. दुपारी रेलचेल वाढली. हाळी येथे ४ हजार ...

हाळी, हंडरगुळीत किरकोळ बाचाबाची
सकाळी साडेसात वाजता दोन्ही गावांत मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीला मतदारांची गर्दी नव्हती. दुपारी रेलचेल वाढली. हाळी येथे ४ हजार ७४९ पैकी ३ हजार ६१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हंडरगुळी येथे ५ हजार ३०० पैकी ३ हजार ८९० मतदारांनी मतदान केल्याचे हाळीच्या तलाठी आलापुरे व हंडरगुळीचे तलाठी कुलदीप गायकवाड यांनी सांगितले.
हाळी येथील मतदान केंद्र २ वर सकाळपासूनच कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक होत होती. हंडरगुळी येथे माजी सरपंच व एका मतदारात धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सपोनि बाळासाहेब नरवटे यांनी पोलीस बंदोबस्त वाढविला. उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांनी दोन्ही गावांतील मतदान केंद्रावर भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व शांतता ठेवण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले.