देवर्जन येथे शरद जोशी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:23+5:302020-12-15T04:36:23+5:30
... करडखेल येथे विविवध उपक्रम उदगीर : करडखेल येथे लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष व लहुजी साळवे ...

देवर्जन येथे शरद जोशी यांना अभिवादन
...
करडखेल येथे विविवध उपक्रम
उदगीर : करडखेल येथे लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष व लहुजी साळवे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गावात दुचाकीफेरी काढण्यात आली. राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. दुपारी लहुजी शक्ती सेनेेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांची सभा झाली. अध्यक्षस्थानी माजी आ. राम गुंडिले हे होते.
...
निलंग्यातील शिबिरात ८८ जणांचे रक्तदान
निलंगा : राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेसच्या वतीने तालुक्यात रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात ८८ जणांनी रक्तदान केले. यशस्वीतेसाठी दिलीप पाटील, ईस्माईल लदाफ, उल्हास सूर्यवंशी, लक्ष्मण कांबळे, महेश चव्हाण, ओम शिंदे, अमर माने, पंकज शिंदे, साजिद शेख, सिद्दीक मुल्ला, अर्जून पाटील, सुनील सांडवे, इब्बू खुरेशी, अबरार पटेल, केरबा आमले, माणिक पांचाळ आदी उपस्थित होते.
...
कायमस्वरुपी पाणीयाेजनेचा प्रारंभ
मुरुड : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मांजरा प्रकल्पातून मुरुड गावासाठी कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बी. एन. डोंगरे, उपसरपंच आकाश कणसे, प्रा. अंकुश नाडे, डॉ. दिनेश नवगिरे, भालचंद्र धावारे, व्यंकट खराडे, महेश सुरवसे, रमेश शिंदे, राहुल टिळक, अमर मोरे आदी उपस्थित होते.