रक्षक ग्रुपच्या वतीने पुलवामा शहिदांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:19+5:302021-02-15T04:18:19+5:30
यावेळी मारोती पाटील म्हणाले, आमच्या भारतमातेचे सुपुत्र जाबाज सैनिक डोळ्यांत तेल घालून देशाच्या सीमेवर आपल्या राष्ट्राचे संरक्षण करतात. शत्रुराष्ट्रांतील ...

रक्षक ग्रुपच्या वतीने पुलवामा शहिदांना अभिवादन
यावेळी मारोती पाटील म्हणाले, आमच्या भारतमातेचे सुपुत्र जाबाज सैनिक डोळ्यांत तेल घालून देशाच्या सीमेवर आपल्या राष्ट्राचे संरक्षण करतात.
शत्रुराष्ट्रांतील सैनिकांनी अचानकपणे विश्रांतीच्या स्थळावर हल्ला करून पुलवामा येथे चाळीस सैनिकांवर बेछूट गोळीबार केला. देशाच्या रक्षणासाठी आमचे सैनिक शहीद झाले. सैनिकांच्या कुटुंबाचा आधार गेला. त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे हीच खरी त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली आहे.
अत्यंत कठीण आणि अवघड परिस्थितीच्या वेळी सैनिकांची खरी परीक्षा असते. जम्मू-काश्मीर व चीनच्या सीमेजवळ लपून-छपून गोळीबार केला जातो; पण त्याचा प्रतिकार करून भारतीय सैनिक जिवाची बाजी करून शहीद होतात. शहीद झालेल्या सैनिकांच्या मुलाबाळांना आधार देऊन त्यांच्या पाठीमागे खंबीर उभी राहण्याची ताकद समाजाने निर्माण करावी, असेही पाटील म्हणाले.