नर्सिंग स्कूलमध्ये अभिवादन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:37 IST2021-02-21T04:37:17+5:302021-02-21T04:37:17+5:30

खोपेगाव ग्रामपंचायतच्या वतीने शिवजयंती साजरी लातूर - तालुक्यातील खोपेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक बालाजी ...

Greetings program at the School of Nursing | नर्सिंग स्कूलमध्ये अभिवादन कार्यक्रम

नर्सिंग स्कूलमध्ये अभिवादन कार्यक्रम

खोपेगाव ग्रामपंचायतच्या वतीने शिवजयंती साजरी

लातूर - तालुक्यातील खोपेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक बालाजी दुधाटे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास मोरे, लक्ष्मण मोरे, ग्रामरोजगार सेवक अमोल घायाळ, दीपक मोरे, सेवक अभिषेक मगर आदींसह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बहूजन भारत पार्टीतर्फे अभिवादन

लातूर - बहूजन भारत पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी नरहरी कदम, दत्ताजी क्षीरसागर, जालिंदर कांबळे, सुनिल कसबे, सुरज गालफाडे, विठ्ठल वाघमारे, रोहीत आडगळे, रत्नदीप इंगळे, स्वप्निल इंगळे, राहूल थोरात आदींसह बहूजन भारत पार्टीच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जयंती साजरी

लातूर - अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉद्य रामचंद्र भांगे, अभिषेक देवणे, मुकेश घार, शिवाजी चव्हाण, मारुती पांडे आदींसह पदाधिका-यांची उपस्थिती होती.

छत्रपती हिंदवी सेनेच्या वतीने अभिवादन

लातूर - छत्रपती हिंदवी सेनेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी अण्णासाहेब सुर्यवंशी, शिवाजी पाटील मसलगेकर, डॉ.एस.आर. अग्रवाल, डॉ. अनिकेत मुंदडा, ॲड. शैलेश सुर्यवंशी, कमलेशिसंह ठाकूर, संजय जैन, हिरालाल सेठ, कांचा शेठ, मकरंद शेळके, कार्तिक कांबळे, प्रितमताई काळे, ॲड. योगिताताई देशमुख, चक्रधर शिंदे, अरबाज मनियार आदींची उपस्थिती होती.

Web Title: Greetings program at the School of Nursing