लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:02+5:302020-12-13T04:34:02+5:30
... गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी कोळनूर : जळकोट तालुक्यातील कोळनूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात ...

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन
...
गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी
कोळनूर : जळकोट तालुक्यातील कोळनूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष जनार्धन चोले, सुरेश चोले, पोलीस पाटील रावसाहेब पाटील, तातेराव चोले, गोपिनाथ चोले, रमेश चोले, डॉ. माधव चोले, परशुराम चोले, धनंजय येलमेवार, राहुल चोले, नामदेव चोले, अशोक चोले आदी उपस्थित होते.
***
...
अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी
उदगीर : तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक, मटका, जुगार सुरु आहे. त्यामुळे महिलांतून संताप व्यक्त होत आहे. तरुण मटका, जुगारात व्यस्त राहत आहेत. परिणामी, घरांत तंट्यांचे प्रमाण वाढले आहे. काही जणांच्या घरात वाद होऊन संसारात विघ्न निर्माण होत आहेत. काही ठिकाणी अवैध दारुविक्री होत आहे. अवैध धंद्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. परंतु, पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
...
मोबाईल सेवा विस्कळीत, ग्राहक झाले हैराण
चाकूर : तालुक्यातील बीएसएनएलची सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. अनेकदा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असे सांगितले जात आहे. त्यामुळे मोबाईलवरुन संवाद साधण्यास अडचणी येत आहे. इंटरनेट सेवा सातत्याने बंद पडत असल्याने ऑनलाईन शिक्षणातही व्यत्यय येत आहे. त्यामुळे काही ग्राहक खाजगी मोबाईल सेवेकडे वळले आहेत. बीएसएनएलने याकडे लक्ष देऊन मोबाईल सेवा सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.
...
औसा तालुक्यात हरभ-याचा पेरा अधिक
नागरसोगा : औसा तालुक्यातील नागरसोगा परिसरातील विहिरी, नाले तुडूंब भरल्याने शेतक-यांनी रबीचा पेरा केला आहे. या भागात सर्वाधिक पेरा हरभ-याचा झाला. तालुक्यातही ५९ हजार हेक्टरवर हरभ-याचा पेरा झाला आहे. तालुक्यात रबी हंगामासाठी लागवडीयोग्य क्षेत्र १ लाख ११ हजार ८१३ हेक्टर आहे. ज्वारीचा पेरा ८ हजार ३४८ हेक्टरवर तर मका ६८२, गहू ३ हजार ६३१ हेक्टरवर झाला आहे. सध्या वातावरणात थंडी अधिक जाणवू लागल्याने रबी पिके बहरत आहेत.
...
कृषी विभागाकडून शेतक-यांना प्रशिक्षण
अहमदपूर : तालुक्यात रबी हंगामाचा पेरा वाढला आहे. दरम्यान, हरभ-यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून घ्यावयाच्या काळजीसंदर्भात शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फवारणीवेळी कोणती दक्षता घ्यावी, याची माहिती देण्यात येऊन प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शेतकरी मेळाव्यास शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.