चापोलीत ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST2021-07-12T04:13:55+5:302021-07-12T04:13:55+5:30
अध्यक्षस्थानी तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर होनराव होते. यावेळी चेअरमन बालाजी शेवाळे, उपसरपंच निसार देशमुख, सिराज देशमुख, माजी चेअरमन भाऊसाहेब होनराव, ...

चापोलीत ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
अध्यक्षस्थानी तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर होनराव होते. यावेळी चेअरमन बालाजी शेवाळे, उपसरपंच निसार देशमुख, सिराज देशमुख, माजी चेअरमन भाऊसाहेब होनराव, माजी उपसरपंच जिलानी शेख, ज्ञानेश्वर वाघमारे, लिंगायत महासंघाचे तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, बाबा देशमुख, ॲड. ओमकार शेट्टे, शिवाजी भिसे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी माजी जि.प. सदस्य डॉ. पुंडलिक चाटे यांची काँग्रेस ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी, सुरेश शेवाळे यांची मनसेच्या चाकूर तालुकाध्यक्षपदी, उमरगा यल्लादेवी येथील खंडेराव शेवाळे यांची काँग्रेस ओबीसी सेलच्या अहमदपूर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश पाटील, सुभाष शंकरे, तुळशीदास माने यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बसवेश्वर मुर्गे, गोवर्धन मद्रेवार, बस्वराज होनराव, सिद्धेश्वर होनराव, तुळशीदास माने, चाँदभाई शेख, माऊली चाटे, बालाजी कांबळे, संदीप आबंदे, कृष्णा होनराव, कपिल पाटील, मारुती पाटील, गजानन भिसे, निखिल होनराव, सोमेश धोंडापुरे, बाबाराव जाधव आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश पाटील यांनी केले. आभार माउली चाटे यांनी मानले.