शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

शिखर शिंगणापूरला जाताना अपघातात आजी-नातवाचा मृत्यू; पाच जखमी : तुळजापूर-लातूर महामार्गावर पहाटेचा अपघात

By राजकुमार जोंधळे | Updated: May 30, 2025 20:26 IST

बाेअरला पाणी लागल्याने अभिषेकासाठी निघाले हाेते गीर कुटुंब

अजित चंदनशिवे / तुळजापूर (जि. धाराशिव) : बोअरवेलला लागलेल्या पाण्याच्या आनंदात शिखर शिंगणापूर येथे महादेवला पाण्याचा अभिषेक घालण्यासाठी निघालेल्या गीर कुटुंबीयाच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला. यामध्ये पाचवर्षीय बालकासह आजीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे तुळजापूर-लातूर रस्त्यावर वडगाव लाख गावानजीक पुलावर घडली. यात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

पोमादेवी जवळगा (जि. औसा) येथील गीर कुटुंबीयाने मागील महिन्यात शेतात घेतलेल्या बोअरवेलला पाणी लागले हाेते. बाेरअच्या पाण्याने शिखर शिंगणापूर येथील महादेवाला अभिषेक घालण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री कुटुंबीय गावातून स्वतःच्या चार वाहनांतून (एमएच. २४-एयू. ५३८१) जात हाेते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास टेम्पो तुळजापूर-लातूर रस्त्यावर वडगाव लाख गावानजीक आला असता, पुलाच्या संरक्षक कठड्यावर आदळला.

दरम्यान, गाडीतील आरडाओरड, नातेवाइकांच्या आक्रोशमुळे रस्त्याने जात असलेल्या ट्रकचालकाने गाडी थांबवून बेशुद्ध अवस्थेतील पाच वर्षाचा अवधूत अमोल गीर या चिमुकल्यासह नरुत्तम प्रेम गीर (वय ६३) यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तपासणीअंती डाॅक्टरांनी अवधूत गीर याला मृत घोषित केले, तर नरुत्तम गीर यांच्यावर उपचार सुरू केले, तर गंभीर जखमी अमोल नरुत्तम गीर (वय ३०), दुर्गा अमोल गीर (वय २४), वैष्णव हनुमंत पुरी (वय २५), गीतांजली अजिंक्य गिरी, जयश्री नरुत्तम गीर (वय ५३) यांना १०८ रुग्णवाहिकेतून तत्काळ घटनास्थळावरून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच आजी जयश्री निरुत्तम गीर यांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या घटनेमुळे गीर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला.

जयश्री गीर या आहेत जिल्हा परिषद शिक्षिका...

देव दर्शनासाठी निघालेल्या जयश्री गीर या अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्याेत मालवली. त्या लोहारा तालुक्यातील माकणी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेवर सहशिक्षिका पदावर कार्यरत होत्या.

जखमींवर सुरू आहेत धाराशिव येथे उपचार...

अपघातात दुर्गा गीर यांच्या पोटचा गोळा मृत झाला आहे, तर गीतांजली गीर यांची जन्म दिलेल्या आई जयश्री यांचा ही मृत्यू झाला. जखमी झालेल्या दुर्गा गीर, वैष्णव पुरी आणि गीतांजली गिरी यांच्यावर धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अमोल गीर आणि निरुत्तम गीर हे डिस्चार्ज घेऊन अंत्यविधीसाठी गावाकडे गेले आहेत.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर