शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर; बदलाव लागली तारीख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 19:08 IST

तळेगाव ( बो ) येथील शेतकऱ्याचा हरभरा हमीभावाने विक्री होत नसल्याने मुलीच्या विवाहाची पुर्व तयारी रखडली असुन , जुळलेल्या रेशीम गाठी पैशाअभावी मोडण्याची वेळ आली आहे

ठळक मुद्देतळेगाव ( बो ) शिवारात भागवत एकुर्गे यांची एकत्र कुटूंबातील ५ हेक्टर्स ५० आर जमीन असुन , यंदा या शेतकऱ्यास हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले आहे . त्यामुळे हरभऱ्याची विक्री करून मुलीचा विवाह पार पाडायचा असा मनोदय करून  एकुर्गे यानी मुलीचा विवाह जुळविला

शिरूर अनंतपाळ (लातूर ) :  तालुक्यातील तळेगाव ( बो ) येथील शेतकऱ्याचा हरभरा हमीभावाने विक्री होत नसल्याने मुलीच्या विवाहाची पुर्व तयारी रखडली असुन , जुळलेल्या रेशीम गाठी पैशाअभावी मोडण्याची वेळ आली आहे .परिणामी मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर होत असल्याने सदर शेतकऱ्याने तात्काळ हमीभावाने हरभरा खरेदी करून रक्कम देण्यात यावी. अशी मागणी शुक्रवारी एका लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यामार्फत थेट मुख्यमंत्र्याकडे केली आहे .

तालुक्यातील तळेगाव ( बो ) शिवारात भागवत एकुर्गे यांची एकत्र कुटूंबातील ५ हेक्टर्स ५० आर जमीन असुन , यंदा या शेतकऱ्यास हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले आहे . त्यांच्या एकत्र कुटूंबातील जमीनत जवळपास २०० कट्टे हरभरे झाले आहेत . त्यामुळे हरभऱ्याची विक्री करून मुलीचा विवाह पार पाडायचा असा मनोदय करून  एकुर्गे यानी मुलीचा विवाह जुळविला आणि २४ एप्रील ही विवाहाची तारीख काढली आहे .परंतु अद्यापि  हरभऱ्याची हमीभावात विक्री झाली नाही. त्यामुळे मुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसर होत आहे. एकुर्गे यानी हरभऱ्याची लवकर विक्री व्हावी यासाठी  आँनलाईन नोंदणी केली आहे .परंतु हरभरा हमीभाव भाव केंद्रावर अद्यापि खरेदी सुरू झाली नसल्याने एकुर्गे यांची मोठी अडचण झाली आहे . त्यामुळे एकुर्गे यानी जिल्हाधिकाऱ्यामार्फत थेट मुख्यमंत्रयास निवेदन देऊन तात्काळ हमीभावाने हरभरा खरेदी करावी अशी मागणी केली आहे .

विवाहाची तारीख बदललीमुलीच्या विवाहास हरभरा विक्रीचा अडसराबाबत एकुर्गे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले बाजरपेठेत हरभरा विक्री केला तर जवळपास दिड लाखाचा तोटा सहन करावा लागत आहे .त्यामुळे हमीभावाने विक्री करावी. यासाठी विवाहाची २४ एप्रील ही तारीख बदलुुन  आता १२ मे तारीख  ठरविण्यात आली आहे . त्यामुळे आता तरी लवकरच लवकर हरभऱ्याची हमीभावात खरेदी करण्यात यावी .असेही एकुर्गे यानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्डagricultureशेतीmarriageलग्नChief Ministerमुख्यमंत्री