ग्रामपंचायतींनी वृक्षारोपणासह संवर्धनाकडे लक्ष द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:00+5:302021-07-16T04:15:00+5:30
तालुक्यातील कबनसांगवी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित वृक्षारोपण व कोविड योद्धयांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव ...

ग्रामपंचायतींनी वृक्षारोपणासह संवर्धनाकडे लक्ष द्यावे
तालुक्यातील कबनसांगवी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित वृक्षारोपण व कोविड योद्धयांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव होत्या. यावेळी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, माजी जि.प. सदस्य दयानंद सुरवसे, अनिल वाडकर, सरपंच अनुश्री केशव सांगवे, ॲड. भगवान सांगवे, धनंजय बाचीफळे, उजळंबचे माजी सरपंच देवानंद पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी आ. बाबासाहेब पाटील म्हणाले, नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेसह गावात वृक्षारोपण करावे. यावेळी आशा कार्यकर्ती राधा घुमाडे, नंदा मोतीपवळे, मीना दुवे यांना सरपंच अनुश्री सांगावे यांच्याकडून २ हजार १०० तर ग्रामपंचायतीच्या वतीने ३ हजारांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास अजय घोरपडे, युवक तालुकाध्यक्ष राहुल सुरवसे, सेवादल तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी, किसान सेल तालुकाध्यक्ष रामदास घुमे, शहराध्यक्ष बिलाल पठाण, विद्यार्थी तालुकाध्यक्ष समाधान जाधव, संदीप शेटे, लहू सुरवसे, मदन रामासाने, भारत दुवे, चेअरमन बाबूराव सूर्यवंशी, विनायक झंडेवाले, सोपान पाटील, व्यंकट सोळंके, माधव घुमाडे, गौतम सोनकांबळे आदी उपस्थित होते.