जळकोट शहरात रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:25 IST2021-07-07T04:25:21+5:302021-07-07T04:25:21+5:30
शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. चंद्रकांत काळे यांच्या रुग्णालयात बाजार समितीचे माजी सभापती मन्मथअप्पा किडे, तहसीलदार संदीप कुलकर्णी ...

जळकोट शहरात रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद
शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. चंद्रकांत काळे यांच्या रुग्णालयात बाजार समितीचे माजी सभापती मन्मथअप्पा किडे, तहसीलदार संदीप कुलकर्णी यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘लोकमत‘चे वृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे, शाखा व्यवस्थापक नितीन खोत, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, सभापती अर्जुन आगलावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष सत्यवान दळवी, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, सामाजिक कार्यकर्ते खादरभाई लाटवाले, उपसरपंच सत्यवान पांडे, दस्तगीर शेख, ॲड. तात्यासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. प्रारंभी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिबिरात १८ जणांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना ‘लोकमत’च्यावतीने प्रशस्तीपत्र देण्यात आले. शिबिराच्या समारोप कार्यक्रमात माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजपचे युवा शहराध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, मन्मथ किडे यांच्याहस्ते रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उदगीरच्या अंबरखाने रक्तपेढीचे डॉ. बी. एम. सेटकार, सोमनाथ स्वामी, माधव बिरादार, योगेश गोदाजी, सुलोचना साबळे, विनायक टवळे, संगमेश स्वामी, डॉ. चंद्रकांत काळे, आयुब शेख, रहमान मोमीन यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.