घरणी पाणी बचाव कृती समितीचा येरोळमोड येथे रास्तारोको
By संदीप शिंदे | Updated: June 28, 2023 19:58 IST2023-06-28T19:57:20+5:302023-06-28T19:58:51+5:30
यावेळी आंदोलनकर्त्यांनी लातूर-उदगीर रोड तीन तास बंद केला होता.

घरणी पाणी बचाव कृती समितीचा येरोळमोड येथे रास्तारोको
येरोळ : शिरूर अनंतपाळ व चाकुर तालुक्यातील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या घरणी मध्यम प्रकल्पातून पाईपलाइनच्या माध्यमातून लातूर शहरालगतच्या भागासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी जमीनीखालुन पाइपलाइ घेऊन जाण्याचे काम सुरु आहे. या कामाच्या विरोधात डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर घरणी पाणी बचाव कृती समितीच्या वतीने सर्व पक्षीय संघठना व तालुक्यातील जनतेच्या वतीने येरोळमोड येथे बुधवारी दुपारी तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनांची तात्काळ दखल घेऊन तहसिलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून योग्य ते कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी लातूर-उदगीर रोड तीन तास बंद केला होता. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनात तालुक्यातील सर्व पक्षीय नेते, शेतकरी व युवक मोठ्या संख्येने सहभागी होते. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पोलिस निरीक्षक प्रविण राठोड व कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.