घरकुल लाभार्थ्यांनी वेळेत बांधकाम पूर्ण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:19+5:302021-07-11T04:15:19+5:30

यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी महेश सुळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी हेर येथे मियावाॅकी पद्धतीने केलेली वृक्ष लागवड, ...

Gharkul beneficiaries should complete the construction on time | घरकुल लाभार्थ्यांनी वेळेत बांधकाम पूर्ण करावे

घरकुल लाभार्थ्यांनी वेळेत बांधकाम पूर्ण करावे

यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी महेश सुळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी हेर येथे मियावाॅकी पद्धतीने केलेली वृक्ष लागवड, नागरी सुविधा जनसुविधा, बाला उपक्रमांतर्गत राऊचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर अंगणवाडीसमोर बिहार पॅटर्न अंतर्गत २०० केशर आंब्याची रोपे लावण्यात आली.

हेर येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या घरकुल बांधकामाची पाहणी करून बांधकाम वेळेत पूर्ण करावेत, अशा सूचना करण्यात आल्या. तसेच २०१८ पासून अपूर्ण असलेल्या घरकुल लाभार्थींच्या अडचणी जाणून घेतल्या. ग्रामपंचायत अभिलेखांची तपासणी करण्यात आली. १४ व्या वित्त आयोगातून व दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पेव्हर ब्लॉक कामाची पाहणी करण्यात आली. ज्यांना घरे नाहीत, अशांची यादी तयार करून रमाई आवास योजनेअंतर्गत तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावे, अशा सूचना करण्यात आल्या.

यावेळी उपअभियंता ए.एस. पाटील, विस्तार अधिकारी उत्तम केंद्रे, विवेक स्वामी, व्यंकटेश दंडे, मंडळ अधिकारी पंडित जाधव, तलाठी बालाजी केंद्रे, शाखा अभियंता व्यंकटेश कासले, विस्तार अधिकारी बोंबले, भागवत टेकाळे, अविनाश सूर्यवंशी, उपसरपंच तुळशीराम बेंबडे, मुख्याध्यापक आबासाहेब नवाडे, विठ्ठल होणाळे, छाया तोंडारे, वैजनाथ मुंडे, तानाजी मुंडे, ग्रामविकास अधिकारी बी.एस. मुसळे, विलास कांबळे, करडखेलचे ग्रामसेवक पी.एन. कानुरे, नरेंद्र पांचाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Gharkul beneficiaries should complete the construction on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.