पाेलीस अधिकारी, कर्मचारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:21 IST2021-09-27T04:21:44+5:302021-09-27T04:21:44+5:30

सभेला प्रमुख पाहुणे म्हणून सहकारी पतसंस्था संघाचे चेअरमन अशाेकराव गाेविंदपूरकर, ओ. डी. सारडा, नगरसेवक वियज धन्ना, जयक्रांती महाविद्यालयाचे प्राचार्य ...

General Meeting of Paelis Officers, Employees Credit Union | पाेलीस अधिकारी, कर्मचारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा

पाेलीस अधिकारी, कर्मचारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा

सभेला प्रमुख पाहुणे म्हणून सहकारी पतसंस्था संघाचे चेअरमन अशाेकराव गाेविंदपूरकर, ओ. डी. सारडा, नगरसेवक वियज धन्ना, जयक्रांती महाविद्यालयाचे प्राचार्य खाकरे, चेअरमन श्रीमंत माेरे यांची उपस्थिती हाेती. यावेळी पतसंस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचे काैतुक करणाऱ्या कार्यक्रमाबराेबरच सभासदांचा दहा लाखांचा अपघात विमा उतरविण्यात आला आहे. २० काेटी भागभांडवल असलेल्या पतसंस्थेने १३ टक्क्यांवरील व्याज १२ टक्क्यांवर आणले आहे, अशी माहिती चेअरमन माेरे यांनी दिली. यावेळी विद्याधर टेंकाळे, बाळासाहेब कन्हेरे, आयुब शेख, व्हाइस चेअरमन संजय कांबळे, सचिव अहेमदमियाॅ खान, राजकुमार गुळभिले, गाेविंद राठाेड, प्रल्हाद केंद्रे, सुग्रीव देशमुख, नवनाथ कल्याणे, किशाेर मंगलगिरे, लता वाघमारे, कल्पना जाधव यांच्यासह पतसंस्थेचे सभासद उपस्थित हाेते. सूत्रसंचालन परमेश्वर अभंगे यांनी केले.

Web Title: General Meeting of Paelis Officers, Employees Credit Union