मराठा सेवा संघाच्या वतीने अहमदपुरात गौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST2021-07-12T04:13:49+5:302021-07-12T04:13:49+5:30
येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गोविंद शेळके होते. यावेळी भाजपचे प्रदेश ...

मराठा सेवा संघाच्या वतीने अहमदपुरात गौरव सोहळा
येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गोविंद शेळके होते. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. हेमंत पाटील, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष अविनाश मंदाडे, डॉ. हरिभाऊ केंद्रे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दत्ताभाऊ गलाले, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोकराव चापटे आदी उपस्थित होते.
यावेळी दिलीपराव देशमुख, ॲड. हेमंतराव पाटील, अविनाश मंदाडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शहरातील प्रवीण डांगे, गोपीनाथ जायभाये, नय्युम शेख, शंकर मुळे, विलास शेटे, माधव भदाडे, अनिल चव्हाण, सुरज पाटील, शिवाजी गायकवाड यांनी रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना मोफत जेवण पुरविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शहराध्यक्ष नाना कदम, सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने यांनी केले. आभार अशोकराव चापटे यांनी मानले.
यशस्वितेसाठी मराठा सेवा संघाचे धनंजय उजनकर, कार्याध्यक्ष ज्ञानोबा भोसले, उपाध्यक्ष प्रा. मारोती बुद्रुक पाटील, शहर सचिव सचिन जगताप, सुनील देशमुख, बालाजी कदम, सिद्धार्थ दापके, शिवशंकर लांडगे, शिवानंद भोसले, प्रशांत माने, संतोष पाटील, विलास आगलावे, दत्ता कदम, सुनील पाटील लांजीकर, राम सूर्यवंशी, सोपान कदम आदींनी परिश्रम घेतले.
सामाजिक बांधीलकीची जपणूक...
माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील म्हणाले, ज्या-ज्या वेळी संकट येते, त्या-त्या वेळी आपण इतरांना मदत केली पाहिजे. कोरोनाच्या संकटाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनायोद्धा यांनी समाजकार्य केले आहे. मराठा सेवा संघ हा सामाजिक बांधीलकी जोपासून सर्वांना न्याय देण्याचे काम करीत आहे. मराठा सेवा संघ हा आदर्शवत सेवा संघ असून दीन, दलित, शोषित, पीडित, उपेक्षितांच्या पाठीमागे सदैव उभा असतो.