शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरच थाटला गॅरेजचा धंदा; ५१९ जणांवर खटले!

By राजकुमार जोंधळे | Updated: June 6, 2023 19:59 IST

साडेतीन लाखांचा दंड : गॅरेज, हाॅटेल, लाॅजचालकांना नाेटिसा...

लातूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर काहींनी गॅरेजचा धंदा थाटला असून, भररस्त्यावरच वाहने थांबविण्यात येत आहेत. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण हाेत आहे. आता महामार्गावरील वाहने, अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका, लातूर शहर वाहतूक शाखेने माेहीम हाती घेतली आहे. गत दाेन दिवसांत साडेतीन लाखांचा दंड करण्यात आला असून, ५१९ जणांवर खटले दाखल केले आहेत.

लातूर शहरातून गेलेल्या बाह्यवळण रस्त्यावर नव्याने हाेत असलेल्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दाेन्ही बाजूंनी राजीव गांधी चाैक ते नवीन नांदेड नाका-गरुड चाैकापर्यंत काहींनी गॅरेजचा व्यवसाय रस्त्यावरच थाटला आहेत. त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आलेली विविध प्रकारची वाहने भररस्त्यावरच थांबविण्यात येत आहेत. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण हाेत आहे. आता हा अडथळा, अतिक्रमण दूर करण्यासाठी लातूर मनपा, वाहतूक शाखेने पुढकार घेत धडक कारवाई सुरू केली आहे. १ ते ६ जून या काळात माेठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. सूचना केल्यानंतरही राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस राेडवर थांबविण्यात आलेली वाहने हटविण्यात आली नाहीत, अशा ५१९ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर ३ लाख ३० हजार २५० रुपयांचा दंड केला. ही कारवाई पाेलिस निरीक्षक गणेश कदम, पाेउपनि. आवेझ काझी, बाळासाहेब केंद्रे, भीमराव हासुळे, रामदास केंद्रे, लखन मनाळे, श्री. सुरवसे, लिंबराज जानकर, अंबादास गुरव, जगन्नाथ कांदे यांच्या पथकाने केली आहे.

रिंगराेडवरील गॅरेज,हाॅटेलचालकांवर कारवाई...लातुरातील महामार्ग सर्व्हिसराेड, रिंगराेडलगत असलेल्या हाॅटेल्स, गॅरेज, लाॅजचालकांना पाेलिसांनी नाेटिसा बजविल्या आहेत. त्यांच्याकडील वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करावी. रस्त्यावरच अस्ताव्यस्त, चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करू नयेत, वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, अशा सूचना पाेलिसांनी दिल्या आहेत.

...तर हाेणार माेटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखलगॅरजेचालक, हाॅटेल व्यावसायिक आणि लाॅजचालकांनी वाहनांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी, अन्यथा कलम १८८ भादंविप्रमाणे आणि माेटार वाहन कायदा सुधारणा २०१९ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय, बेशिस्तपणे थांबविण्यात आलेल्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.      - पाेनि. गणेश कदम, शहर वाहतूक शाखा, लातूर

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीTrafficवाहतूक कोंडी