शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उजव्या हातावर 'गजानन जिरे' तर डाव्यावर 'लव्ह'; रेल्वेच्या धडकेत मृत तरुणाची ओळख पटेना

By राजकुमार जोंधळे | Updated: September 15, 2022 17:24 IST

लातुरात रेल्वेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू; चोवीस तासानंतरही तरुणाची ओळख पटेना !

लातूर : रेल्वेच्या धक्क्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लातूर शहरातील साई रोड रेल्वे पुलानजीक बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी गेल्या २४ तासानंतरही एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, त्या तरुणाची ओळख काही अद्याप पटली नाही. सध्याला मृतदेह शवागरातील शीतगृहात ठेवण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले, लातुरातील साई रोड रेल्वे पुलानजीक रेल्वे रुळावर एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या आढळून आला होता. दरम्यान, मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. तरुणाच्या अंगात निळसर-काळसर टी-शर्ट, मळकट निळी जिन्स असे कपडे आहेत. शिवाय, उजव्या हातावर गजानन जिरे असे नाव तर डाव्या हातावर 'लव्ह'चं चिन्ह वर्तुळात गोंदवलेलं आहे, अशा वर्णनाचा व्यक्ती कोणी हरवला असेल, कोणी बेपत्ता झाला असेल तर पोलिसांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी केले आहे.

विविध ठिकाणी शोध मोहीम...लातूरसह शेजारच्या परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि बिदर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत. वरील वर्णनाचा कोणी तरुण गायब झाला आहे का, याचाही तपास केला जात आहे. त्याचबरोबर राज्याच्या ग्रुपवर पोलिसांनी मृतदेहाचे छायाचित्र व्हायरल केले आहे.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघातDeathमृत्यूrailwayरेल्वे