‘संडे लीग’मार्फत व्हॉलिबॉलचा मैत्रीपूर्ण सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST2021-07-26T04:19:45+5:302021-07-26T04:19:45+5:30
लातूर : जिल्ह्यात व्हॉलिबॉल खेळाची परंपरा आहे. अनेक क्लबच्या माध्यमातून खेळाडू दैनंदिन सराव करतात. कोरोनामुळे स्पर्धा बंद असल्यातरी लातुरात ...

‘संडे लीग’मार्फत व्हॉलिबॉलचा मैत्रीपूर्ण सामना
लातूर : जिल्ह्यात व्हॉलिबॉल खेळाची परंपरा आहे. अनेक क्लबच्या माध्यमातून खेळाडू दैनंदिन सराव करतात. कोरोनामुळे स्पर्धा बंद असल्यातरी लातुरात रविवारी संडे लीगमार्फत महाराष्ट्र क्लब व फ्रेण्ड्स क्लब यांच्यात रविवारी सकाळी क्रीडा संकुलात मैत्रीपूर्ण सामना झाला. या सामन्यात नवोदित खेळाडूंनी कौशल्य पणाला लावले.
कोरोनामुळे खुल्या व्हॉलिबॉल स्पर्धा बंद आहेत. खेळाडूंना स्पर्धेचा सराव मिळावा तसेच राज्य स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी शहरातील क्रीडा संकुलात प्रत्येक रविवारी महाराष्ट्र क्लब व फ्रेण्ड्स क्लब यांच्यात मैत्रीपूर्ण सामना होत आहे. २५ जुलै रोजी संडे लीग अंतर्गत तिसरा सामना झाला. यात महाराष्ट्र क्लबकडून सेंट्रल ब्लॉकर विशाल वगरे, काऊंटर अटॅकर सोनू सोमवंशी, सेटर विठ्ठल कवरे, ललित जोशी यांचा खेळ उत्कृष्ट झाला, तर फ्रेण्ड्स क्लबकडून काऊंटर अटॅकर शोएब शेख, आफताब शेख, सेटर शहाबाज पठाण, लिबिरो सरफराज शेख यांनी कौशल्याची चुणूक दाखविली. यावेळी प्रशिक्षक डॉ. लायक पठाण, प्रा. डॉ. कैलास पाळणे, माजी खेळाडू महेश पाळणे, दिनेश खानापुरे, नसरू फुलारी, अब्दुल शेख, रियाज शेख, नंदू भोसले, गणेश हाके, रितेश अवस्थी, पवन पाळणे, विजय सोनवणे यांच्यासह व्हॉलिबॉलप्रेमींची उपस्थिती होती.