शहरातील व्यापाऱ्यांची मोफत कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST2021-03-26T04:19:21+5:302021-03-26T04:19:21+5:30
रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून निर्बंध लावण्यात येत आहेत. रात्री ८ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी आहे. फिजिकल डिस्टन्स, मास्क ...

शहरातील व्यापाऱ्यांची मोफत कोरोना चाचणी
रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून निर्बंध लावण्यात येत आहेत. रात्री ८ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी आहे. फिजिकल डिस्टन्स, मास्क न वापरल्याप्रकरणी कारवाई केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्रस्तुत केंद्रांवर रॅपिड अँटीजन टेस्ट व्यापाऱ्यांना करता येणार आहे. दुकानातील कर्मचारी व स्वत: व्यापाऱ्यांनी टेस्ट करून घेणे बंधनकारक आहे. येणाऱ्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढल्यास प्रशासनाला कडक पावले उचलावे लागू शकते. त्यावेळेस आपली अडचण होऊ नये, याची काळजी घेऊन सर्वांनी टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी केले आहे.