सोमनाथपूरच्या सर्वरोग निदान शिबिरात ९९ जणांची मोफत तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:16+5:302021-07-09T04:14:16+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग, उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, ...

सोमनाथपूरच्या सर्वरोग निदान शिबिरात ९९ जणांची मोफत तपासणी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य कला व सांस्कृतिक विभाग, उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मधुमेह, रक्तदाब तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच राम सूर्यवंशी होते. उद्घाटन पं. स. सदस्य सारजा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच संगीता राठोड, वैजनाथ तोंडारे, जितेंद्र शिंदे, मारोती पवार, किशन चव्हाण, राजेश भाटे आदी उपस्थित होते.
यावेळी ९९ जणांची मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली. २० रुग्णांवर उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. १२ मधुमेही आढळून आले. शिबिरासाठी डॉ. प्रशांत नवटक्के, अभिजित औटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा दीपाली औटे, डॉ. व्यंकटेश वट्टमवार, डॉ. संदीप सोनटंक्के, रतिकांत घोगरे, ओमकार निरणे, शेख मोहम्मद, सय्यद सलीम, नारायण मानकोळे, बळवंत चिंचोलकर, ज्योती स्वामी, केशव बिरादार, रामेश्वर फुलारी यांनी पुढाकार घेतला.