ऑटाे स्पेअरपार्ट कंपनीची ३० लाखांना केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:33 IST2020-12-13T04:33:53+5:302020-12-13T04:33:53+5:30

पाेलिसांनी सांगितले, अविनाश शांताराम आहेर (४४ रा. काकडे पार्क, तानाजी नगर, पिंपरी चिंचवड, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ...

Fraud of Rs 30 lakh by Ota Spare Part Company | ऑटाे स्पेअरपार्ट कंपनीची ३० लाखांना केली फसवणूक

ऑटाे स्पेअरपार्ट कंपनीची ३० लाखांना केली फसवणूक

पाेलिसांनी सांगितले, अविनाश शांताराम आहेर (४४ रा. काकडे पार्क, तानाजी नगर, पिंपरी चिंचवड, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. एका ऑटाे रिक्षा स्पेअर पार्ट वितरक कंपनीची लातूर शहरातील राजीव गांधी चाैक, औसा राेड येथे शाखा आहे. या शाखेतील स्पेअर पार्टची विक्री झाल्यानंतर त्यातून जमा झालेली कंपनीची ३० लाखांची रक्कम कंपनीच्या बँक खात्यावर जमा न करता, अक्षय अर्जुन गायकवाड (२७ रा. लातूर) याच्यासह अन्य एकाने स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन कंपनीची फसवणूक केली. सदरची घटना १ मे २०१९ ते २० मार्च २०२० या कालावधीत लातूर शहरात घडली. याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापनाने अधिक चाैकशी केली असता, सदरची फसवणूक समाेर आली आहे. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अक्षय गायकवाड आणि अन्य एकाविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

Web Title: Fraud of Rs 30 lakh by Ota Spare Part Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.