शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

लातूरात चार माजी महापौर उतरले निवडणूक रिंगणात; पक्षांतरानंतर चुरस अन् प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:03 IST

लातूर शहर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी

लातूर : महापालिकेची स्थापना झाल्यापासून आजवर पाच महापौर झाले आहेत. त्यापैकी चार जणांनी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या पक्षांतराने चारही माजी महापौरांच्या लढाईत चुरस वाढली असून, सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकमेव माजी महापौर अख्तर मिस्त्री हे निवडणुकीच्या मैदानापासून दूर आहेत.

महापालिकेत पहिल्या महापौर ठरलेल्या प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, ॲड. दीपक सूळ, विक्रांत गोजमगुंडे, सुरेश पवार हे पुन्हा एकदा मैदानात आले आहेत. प्रशासकीय कामाच्या अनुभवावर हे उमेदवार मतदारांच्या दारावर जात आहेत. काँग्रेसकडून माजी महापौर स्मिता खानापुरे यांनी प्रभाग १५, माजी महापौर ॲड. दीपक सूळ प्रभाग क्र.१०, राष्ट्रवादी (अजित पवार)कडून माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, तर प्रभाग ६ मधून शिंदेसेनेकडून माजी महापौर सुरेश पवार यांनी उमेदवारी दाखल केली आहे. छाननीत सर्वांचेच अर्ज वैध ठरले असून, मैदानात असलेले चौघे मूळ काँग्रेसचे आहेत. त्यात सर्वात आधी सुरेश पवार यांनी भाजप, राष्ट्रवादी या पक्षांनंतर आता शिंदेसेना गाठली आहे. तर, विक्रांत गोजमगुंडे यांनी निवडणुकीच्या तोंडावर हात सोडून घड्याळ बांधले आहे. त्यामुळे चारही महापौरांच्या प्रभागातील लढती चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.

काँग्रेस विरुद्ध भाजपलातूर महापालिकेचा सामना काँग्रेस विरुद्ध भाजप असा रंगणार असला, तरी काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे हे राष्ट्रवादीकडून, तर माजी महापौर सुरेश पवार शिंदेसेनेकडून उभे आहेत. दोघांनाही काँग्रेस आणि भाजपच्या तुल्यबळ उमेदवारांचे आव्हान असेल.

कंत्राट आणि विकासकाँग्रेसने प्रचाराच्या प्रारंभालाच कंत्राटदारासाठी भाजपने मनपात योजना आणल्या, असा आरोप केला आहे. सामान्य माणूस नव्हे, तर भाजपसाठी कंत्राटदार केंद्रबिंदू आहे, असा थेट प्रहार माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी केला आहे. त्यावर पलटवार करताना माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आ. अमित देशमुख यांनी आमदारकीच्या काळात काय केले हे आधी सांगावे, असे आव्हान दिले आहे. रविवारचा प्रचार अशा आरोप-प्रत्यारोपाने रंगला.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur: Four Former Mayors Compete, Parties Change, Prestige at Stake

Web Summary : Four former Latur mayors are contesting elections after switching parties, intensifying the competition. Key candidates from Congress, NCP, and Shiv Sena (Shinde faction) face challenges, making the battle prestigious. Development and contracts are central campaign issues.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६