जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ राष्ट्रवादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:20+5:302021-07-09T04:14:20+5:30
याप्रसंगी पंडितराव धुमाळ यांच्यासह माजी जि.प. सदस्य प्रवीण सुरवसे, वैभव म्हेत्रे, अनिलकुमार देवंग्रे, बालाजी लवे, सचिन दोडके, गुणवंत जाधव, ...

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ राष्ट्रवादीत
याप्रसंगी पंडितराव धुमाळ यांच्यासह माजी जि.प. सदस्य प्रवीण सुरवसे, वैभव म्हेत्रे, अनिलकुमार देवंग्रे, बालाजी लवे, सचिन दोडके, गुणवंत जाधव, संजय सावकार, बालाजी पाटील, सुधीर धुमाळ, विशाल धुमाळ, बळीराम माने आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश जनरल सेक्रेटरी शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, ज्येष्ठ नेते डी. एन. शेळके, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, बबन भोसले, नरेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी निलंगा तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष विशाल पाटील, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष उल्हास सूर्यवंशी, ॲड. निहाल पटेल आदी उपस्थित होते.