शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरच्या समतानगरला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचा प्रशासनाला विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST

उदगीर : शहरातील समतानगर मार्गावर असलेल्या रेल्वे रुळावरून वाहतुकीसाठी दिवसातून सातत्याने रेल्वे फाटक बंद होत असल्याने तासन्‌तास वाहतुकीचा ...

उदगीर : शहरातील समतानगर मार्गावर असलेल्या रेल्वे रुळावरून वाहतुकीसाठी दिवसातून सातत्याने रेल्वे फाटक बंद होत असल्याने तासन्‌तास वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे समतानगर व संतोषीमातानगरातील नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्ग उभारण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले होते; परंतु त्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.

उदगीरमधील रेल्वेस्थानकाच्या जवळपास ३०० मीटर अंतरावर समतानगर आहे, तसेच उदगीर शहराला जोडणाऱ्या भागावर दक्षिण मध्य रेल्वेचे फाटक आहे. या रुळावरून प्रवासी व मालवाहतुकीच्या रेल्वेगाड्यांची सतत ये-जा असते. त्यामुळे येथे रेल्वे येण्याअगोदर किमान १५ मिनिटे रेल्वेचे फाटक बंद करण्यात येते. समतानगर, संतोषीमातानगर, डॅम रोड, गोपाळनगर, क्रांतीनगर, नेत्रगाव, येणकी, मानकी, देवणी या भागांत जाणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे.

समतानगर, गोपाळनगर, रेल्वे स्टेशनसमोरील भाग, संतोषीमातानगर, क्रांतीनगर आदी भागांत उदगीर शहरातील किमान २० टक्के नागरी वसाहत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी या भागातील नागरिकांनी प्रशासनाने भुयारी मार्ग तयार करावा, अशी मागणी करून विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर हालचाली होऊन स्थानिक प्रशासन व दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता यांच्यात बैठक झाली आणि रेल्वे गेटच्या पलीकडे असलेला भुयारी मार्ग स्थानिक प्रशासनाने मोकळा करण्याचे व त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करणे व इतर मदत रेल्वे खात्याने पुरविण्याचे ठरले.

मात्र, निवडणुका होऊन एक वर्ष झाले तरी स्थानिक प्रशासन व रेल्वे प्रशासनाने कुठलीही हालचाल केली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक प्रशासन व रेल्वे खात्याने लवकरात लवकर भुयारी मार्ग मोकळा करून द्यावा. जेणे करून या मार्गावर होणारी वाहतूक सुरळीत होईल, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

केवळ सर्व्हे करण्यात आला...

विधानसभा निवडणुकीवेळी केवळ सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर कुठलीही कार्यवाही झाली नाही. आमदार अथवा खासदार फंंडातून काही आर्थिक तरतूद झाल्यास त्या ठिकाणी भुयारी मार्ग करणे शक्य होईल.

- बस्वराज बागबंदे, नगराध्यक्ष.

इच्छाशक्तीचा अभाव...

राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रश्न प्रलंबित आहे. स्थानिक राजकीय मंडळी, खासदारांनी पाठपुरावा केल्यास हे काम होईल, अन्यथा या भागातील नागरिकांची या त्रासातून सुटका होणे शक्य नाही, असे रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले.

-------------------------------