शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

लातुरात विदेशी दारूचा बाजार जोमात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:40 IST

सोमवारी वाईन ५ हजार ३७३ तर  बिअरची विक्री ८ हजार लिटर्स

ठळक मुद्देशहरात होम डिलेव्हरी नावालाच 

- आशपाक पठाणलातूर : राज्य शासनाने लॉकडाऊन काळात फिजिकल डिस्टन्सिंग पाळला जावा आणि मद्य विक्री व्हावी, यासाठी शुक्रवारपासून होमडिलिव्हरी केली़ मात्र, बुकींग केलेले हजारो ग्राहक चार दिवसानंतरही वेटिंगवरच आहेत़  थेट दुकानदार ते ग्राहक  अशी विक्री अपेक्षित असताना यात नवीन साखळी तयार झालीे़ प्रत्यक्षात यातून मोठा काळा बाजार होत असून  दुप्पट ते तिप्पट दरात विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे़

लातूर जिल्ह्यातील ८ वाईन शॉप व २५ बिअर शॉपीमधून चार दिवसांपासून होमडिलिव्हरी सुरू असली तरी प्रत्यक्षात मागणी करणाऱ्या हजारो ग्राहकांपर्यंत मद्य पोहचले नसल्याची ओरड आहे़ शुक्रवारी दोन हजार ग्राहकांनी आॅनलाईन मागणी केली, त्यात केवळ ६ हजार लिटर्स डिलिव्हरी झाली़ शनिवारी दिवसभरात ६ हजार ३४० ग्राहकांनी मागणी नोंदविली असता त्यातील २ हजार ६३७ जणांना होम डिलिव्हरी झाल्याचा दावा प्रशासनाने केला़ मग एवढ्या ग्राहकांना ६ हजार लिटर्स दारू दिली कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ शिवाय, होम डिलिव्हरी असताना रविवार अन् सोमवारीही शहरात काही ठिकाणी मागच्या दारातून विक्री सुरू होती, त्यामुळे इथली गर्दी हटविण्यासाठी पोलीसही धावले़ मग होम डिलिव्हरी असताना दुकानावर गर्दी कशी? ओळखीच्या ग्राहकांना दारू दिली जात असून नवीन ग्राहकांना हाकलून दिले जात असल्याचा आरोप काही ग्राहकांनी केला़

गर्दीच टाळायची तर ही दुकाने उघडा ?वाईनच्या किंमतीपेक्षा दुप्पट, तिप्पट दर घेतले जात आहेत, पावती नसल्याने त्याचा बोभाटही नाही़ लातूर जिल्ह्यात देशी दारूची ९२ दुकाने आहेत, तर परवानाधारक बिअर बार ४७७ असून त्यातील ४२५ बार सुरू होते़ लॉकडाऊन काळात ही सर्व दुकाने बंद करण्यात आली़ गर्दीच टाळायची तर ही ५०० दुकाने सुरू व्हायला हवीत, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे़

बंद दुकानासंदर्भात शासनाला प्रस्ताव : बारगजेजिल्ह्यात बिअर बार, देशी दारूच्या दुकानातून पार्सल सेवा सुरू करावी, यासाठी आम्ही प्रस्ताव पाठविला आहे़ कोणती दुकाने सुरू ठेवायची अन् कोणती बंद याचा निर्णय शासनाचा आहे़ जिल्ह्यात सध्या ८ वाईन शॉपमधून होम डिलिव्हरी होत आहे़ रविवारी विदेशी दारू ५ हजार ९४८ लिटर्स व ३ हजार ९१९ लिटर्स बिअर तर सोमवारी ५ हजार ३७३ लिटर्स विदेशी, ८ हजार ९० लिटर्स बिअर्स विक्री झाली आहे़ किमतीपेक्षा अधिक रक्कम ग्राहकांनी देऊ नये, विक्रेत्यांनी तशी विक्री करू नये, अशा सूचना करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांनी सांगितले़

विक्रीचा आलेख वाढला़़़ (आकडा लिटर्समध्ये)शनिवार - विदेशी ५१२२  बिअर ९३५  (लिटर्स)रविवार  - विदेशी ५९४८   बिअर ३९१९ (लिटर्स)सोमवार - विदेशी ५३७३  बिअर ८०९० (लिटर्स)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर