निटूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच हजार जणांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:18 IST2021-05-23T04:18:39+5:302021-05-23T04:18:39+5:30
निटूर प्राथमिक आरोग्य केंद्र पाच एकरावर असून, कर्मचारी वसाहत, सौर ऊर्जा, पाणी अशा आवश्यक सर्वसुविधा उपलब्ध आहेत. केंद्राचे वैद्यकीय ...

निटूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच हजार जणांना लसीकरण
निटूर प्राथमिक आरोग्य केंद्र पाच एकरावर असून, कर्मचारी वसाहत, सौर ऊर्जा, पाणी अशा आवश्यक सर्वसुविधा उपलब्ध आहेत. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास मोरे, डॉ. प्रतिभा पवार आहेत. केंद्राअंतर्गत ३२ गावे असून, २५ कर्मचारी, ४० आशा स्वयंसेविका आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळात आरोग्य केंद्राने उत्कृष्ट कार्य केले आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सुरुवातीचे तीन महिने सकाळी ७.३० वाजतापासून ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत नागरिकांत जनजागृतीसाठी मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी सर्व आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, वाहनचालक व परिचर यांचे सहकार्य मिळाले.
आरोग्य केंद्रात आतापर्यंत कोविडच्या एकूण ६ हजार ३०० डोस देण्यात आल्या आहेत. त्यासाठी वेळापत्रक तयार करून १४ ठिकाणी उपलब्ध साठ्यानुसार लसीकरण करण्यात येत आहे.
सुटीविना कार्य सुरूच...
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत अँटिजन व आरटीपीसीआर अशा एकूण ११ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावात तातडीने कॅम्प घेण्यात येऊन तपासणी करण्यात आली. कोविडबरोबरच नियमित नॉन कोविडचे काम अखंडित सुुरू आहे. जसे नियमित लसीकरण, बाह्यरुग्ण तपासणी, संदर्भसेवा, प्रसूती, न्याय वैद्यकीय प्रकरणे, शवविच्छेदन अशी कामे केली जात आहेत. विनासुटी आरोग्य कर्मचारी सेवा देत आहेत, असे वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीनिवास मोरे यांनी सांगितले.