ऑनलाईन पद्धतीने पाच लाख लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST2021-07-11T04:15:51+5:302021-07-11T04:15:51+5:30
येथील गोकुळधाम येथील बंडेप्पा मल्लिकार्जुन कंटे यांच्या मोबाईलवर शनिवारी सकाळी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी संदेश व कस्टमर सर्व्हिस नंबर आला. २४ ...

ऑनलाईन पद्धतीने पाच लाख लांबविले
येथील गोकुळधाम येथील बंडेप्पा मल्लिकार्जुन कंटे यांच्या मोबाईलवर शनिवारी सकाळी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी संदेश व कस्टमर सर्व्हिस नंबर आला. २४ तासांत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी हा ९३८२५१o५९o नंबर दिला. या मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, मी बीएसएनएलमधून बोलतोय, तुमच्या कागदाचे व्हेरिफिकेशन करायचे आहे. तुम्ही तुमच्या ऑनलाईन ॲपवरून १० रुपयांचा तुमच्या बँक खात्यातून रिचार्ज करा. संबंधित व्यक्तीने फोन बंद करू नका, तो चालूच ठेवा म्हणून सांगितले. दरम्यान, कंटे यांच्या खात्यातून ५ लाख २८ हजार ६३५ रुपये ऑनलाईन पद्धतीने लंपास केल्याचे लक्षात आले. तात्काळ त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ बँक अकाऊंट सील केले. बंडेप्पा कंटे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक एडके यांनी दिली.