ट्रक-कारच्या अपघातात पाच जण जखमी; अहमदपूर-शिरुर ताजबंद महामार्गावरील घटना
By संदीप शिंदे | Updated: August 4, 2023 14:25 IST2023-08-04T14:25:11+5:302023-08-04T14:25:43+5:30
या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले आहेत.

ट्रक-कारच्या अपघातात पाच जण जखमी; अहमदपूर-शिरुर ताजबंद महामार्गावरील घटना
अहमदपूर (जि.लातूर) : अहमदपूर -शिरूर ताजबंद मुख्य राज्य महामार्गावर शुक्रवार सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असून, त्यांना उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले आहे.
लातूरहून चाकूरकडे जाणारी कार क्रमांक एमएच १४ एफएम ९२७८ आणि अहमदपूरकडून येणाऱ्या भरधाव ट्रक केए ३१ एए ६७५८ ची शिरुर ताजबंदनजिक शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले आहेत. तर एकजण गंभीर जखमी आहे. या अपघातात कारमधील शिवाजी सुर्यवंशी, आशा शेख, उषा इंगळे व इतर दोन जण जखमी आहेत. घटनास्थळी पोलीस कर्मचारी विक्रम सुर्यवंशी, के.बी. जायभाय यांनी भेट देऊन मदतकार्य केले.