जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर पाच दिवस पथकांची छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST2021-07-29T04:21:21+5:302021-07-29T04:21:21+5:30
लातूर : जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या विशेष पाेलीस पथकासह स्थानिक पथकांनी दि. २३ ते २७ जुलै दरम्यान ...

जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर पाच दिवस पथकांची छापेमारी
लातूर : जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या विशेष पाेलीस पथकासह स्थानिक पथकांनी दि. २३ ते २७ जुलै दरम्यान जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायावर छापेमारी केली. दरम्यान, याप्रकरणी त्या-त्या पाेलीस ठाण्यात तब्बल २७२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर २९१ जणांविराेधात कारवाई करण्यात आली आहे. यावेळी तब्बल ६ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहर उपविभागात जुगार प्रतिबंध कायद्यानुसार एकूण दाेन खटले दाखल केले आहेत. येथे १३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारूबंदी कायद्यानुसार एकावर गुन्हा दाखल आहे. येथे आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दारुबंदीचे आठ खटले दाखल केले आहेत. यामध्ये ९ जणांविराेधात गुन्हे दाखल केले असून, त्यांच्याकडून १ लाख २० हजार ८२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगाराचे ३ खटले दाखल केले असून, २९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दारुबंदीचे १४ खटले दाखल केले असून, १४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून ७७ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लातूर शहरात जुगाराचे दाेन खटले दाखल असून, ९ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर दारुबंदीचे ४५ खटले दाखल आहेत. याप्रकरणी ४५ जणांवर गुन्हे दाखल असून, त्यांच्याकडून १ लाख ११ हजार ८४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लातूर ग्रामीण उपविभागात जुगाराचा एक खटला दाखल आहे. दारुबंदीची २२ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २९ हजार ५०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. औसा उपविभागात जुगारप्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर दारुबंदीप्रकरणी ५८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यावेळी ६७ हजार ३८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निलंगा उपविभागात जुगारप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल आहेत तर १३ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध दारुविक्रीप्रकरणी ४१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून ९९ हजार ५५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उदगीर उपविभागात जुगाराचे ३ खटले दाखल आहेत. यावेळी २ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर अवैध दारुविक्री करणाऱ्या २१ जणांविराेधात गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून ३५ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अहमदपूर उपविभागात जुगारप्रकरणी १४ जणांवर खटले दाखल असून, ७ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध दारुविक्रीप्रकरणी २७ जणांविराेधात गुन्हे दाखल आहेत. ५५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे. चाकूर उपविभागात जुगारप्रकरणी दाेघांवर खटले दाखल असून, ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैध दारुविक्री केल्याप्रकरणी ४७ गुन्हे दाखल आहेत. यावेळी ६७ हजार ७३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.