देवणी तालुक्यात तीन दिवसात पाच कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST2021-05-29T04:16:25+5:302021-05-29T04:16:25+5:30
तालुक्यात एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला होता. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली होती. प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य, महसूल, पंचायत समिती, पोलिसांनी प्रतिबंधात्मक ...

देवणी तालुक्यात तीन दिवसात पाच कोरोना बाधित
तालुक्यात एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला होता. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली होती. प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य, महसूल, पंचायत समिती, पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. जिथे कोरोना रुग्ण आढळून आले, तिथे कोविड चाचण्यांवर भर देण्यात आला. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत झाली आहे.
तालुक्यात सध्याच्या आठवड्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण चांगलेच कमी झाले आहे. मंगळवारी २, बुधवारी १, गुरुवारी २ रुग्णांची वाढ झाली आहे. तीन दिवसात तालुक्यात एकूण केवळ पाच नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, तालुक्यातील ५४ पैकी १९ गावात काेरोना बाधित आहेत. उर्वरित गावे कोरोनामुक्त झाली आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये ९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधितांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूची संख्या कायम आहे. २४ मेपर्यंत ३९ कोरोना बाधित दगावले होते. मात्र गुरुवारपर्यंत ही संख्या ४६ वर पोहोचली आहे. गुरुवारपर्यंत तालुक्यात एकूण बाधितांची नोंद १ हजार ५५१ अशी झाली असून, त्यापैकी १ हजार ४५९ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तालुक्यात केवळ ४६ रुग्ण आहेत.
नागरिकांनी काळजी घ्यावी...
देवणी शहरात एकूण २४८ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी २४२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. दोन रुग्ण दगावले. शहरात आता चार रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य प्रशासनाने दिली. दरम्यान, नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, शासन नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.