काेराेनाला वाकुल्या दाखवत गावा-गावांत उडाला तब्बल साडेपाच हजार लग्नांचा बार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:18 AM2021-04-19T04:18:13+5:302021-04-19T04:18:13+5:30

लातूर : यंदा लग्नसराईचा हंगाम नाेव्हेंबरपासून सुरू झाला. नाेव्हेंबर, डिसेंबर अन् जानेवारी २०२१ मध्ये काेराेनाच्या नियमांचे पालन करत ...

Five and a half thousand wedding bars were blown up in the villages showing Kareena's curves! | काेराेनाला वाकुल्या दाखवत गावा-गावांत उडाला तब्बल साडेपाच हजार लग्नांचा बार !

काेराेनाला वाकुल्या दाखवत गावा-गावांत उडाला तब्बल साडेपाच हजार लग्नांचा बार !

Next

लातूर : यंदा लग्नसराईचा हंगाम नाेव्हेंबरपासून सुरू झाला. नाेव्हेंबर, डिसेंबर अन् जानेवारी २०२१ मध्ये काेराेनाच्या नियमांचे पालन करत शेकडाेंच्या संख्येत लग्नसाेहळे पार पडले. फेब्रुवारीनंतर काेराेनाबाधितांची संख्या वाढत गेली अन् शासनाचे कडक निर्बंध लागू झाले. मात्र, काेराेनाला वाकुल्या दाखवत गावा-गावांत हजाराे कुटुंबीयांनी लग्नाचा बार उडविला.

नाेव्हेंबर ते मार्च या काळात जवळपास तब्बल ५,५०० पेक्षा अधिक लग्न पार पडल्याची माहिती समाेर आली आहे. हा आकडा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश कुटुंबीयांनी घरीच लग्न उरकली आहेत, तर काहींनी माेजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नाचा बार उडविला. काहींना तर परिस्थितीचा अंदाज घेत किमान दाेन ते तीन वेळा तारखा बदलाव्या लागल्या आहेत. आता, परिस्थिती निवळेल, याची वाट पाहिली जात आहे. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नतिथींचा मुहूर्त आहे. मात्र, भविष्यातील परिस्थितीचा अंदाज हाती येत नाही.

अनेकांनी नाेंदणी विवाहाला दिले प्राधान्य...

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि बदलत जाणारी परिस्थिती पाहता काहींनी थेट नाेंदणी विवाहाला प्राधान्य दिले आहे. यातून काेराेनाचे संकट टाळण्यात काही कुटुंबे यशस्वी ठरली आहेत. काहींनी माेजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न उरकले. मात्र, लग्नात सहभागी झालेल्या वऱ्हाडींनाच काेराेनाची बाधा झाल्याचे समाेर आले आहे. काेराेनाला बाजूला सारत अनेकांनी नाेंदणी विवाह केला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा लग्नसराईवर काेराेनाचे सावट आहे. नाेव्हेंबर ते फेब्रुवारी या काेराेनाच्या रुग्णांची संख्या घटली हाेती. परिणामी, प्रशासनाकडून शिथिलता देण्यात आली हाेती. मात्र, मार्चपासून पुन्हा कोराेनाने डाेके वर काढले आणि परिस्थितीच पालटली. अनेक जण लग्नासाठी बुकिंग केलेले मंगल कार्यालय रद्द केले. यातून आम्हा चालकांचे माेठे नुकसान झाले आहे. सध्याला तर प्रशासनाकडून बंदीच आहे.

- नरेश थाेरमाेटे-पाटील, लातूर

काेराेना महामारीने मंगल कार्यालयांचे व्यवस्थापनच काेलमडले आहे. यंदाच्या हंगामातील उलाढाल पूर्णत: ठप्प झाली आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यांतील तारखांची बुकिंग काही कुटुंबीयांना रद्द करावी लागली आहे. सध्याला नाेकरांचे पगार, मंगल कार्यालयाच्या देखभालीचा खर्चही पदरमाेड करून करावा लागत आहे. बँक कर्जाचे हप्तेही भरणे कठीण झाले आहे. सध्याला मंगल कार्यालयातील कार्यक्रमांना बंदी आहे. हाेणारे नुकसान न भरून येणारे आहे.

- याेगेश गिरवलकर, लातूर

यंदा विवाहाचे ५३ मुहूर्त

१९ जानेवारी ते २१ एप्रिलपर्यंत यंदा गुरू-शुक्र अस्तामुळे तारखा कमीच आहेत. दिवाळीनंतर तुलसी विवाह झाल्यानंतर लग्नांचा धडका सुरू हाेताे. मात्र, काेराेनाने अडचण केली आहे. नाेव्हेंबर ते जुलै या कालावधीत एकूण ५३ शुभ मुहूर्त आहेत. एप्रिल - ७, मे महिन्यात १५, जून - ८ आणि जुलै महिन्यात ४ तारखाच आहेत.

Web Title: Five and a half thousand wedding bars were blown up in the villages showing Kareena's curves!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.