स्मार्ट व्हीलेज स्पर्धेत गंगापुर ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:18 IST2021-05-23T04:18:52+5:302021-05-23T04:18:52+5:30
मागील तीन वर्षात गंगापुर गावाने विकास कामात उत्तुंग भरारी घेतली असुन, नवीन ग्रामपंचायत कार्यालय, चार पाणीशुध्दीकरण केंद्र, पिठाची गिरणी, ...

स्मार्ट व्हीलेज स्पर्धेत गंगापुर ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम
मागील तीन वर्षात गंगापुर गावाने विकास कामात उत्तुंग भरारी घेतली असुन, नवीन ग्रामपंचायत कार्यालय, चार पाणीशुध्दीकरण केंद्र, पिठाची गिरणी, मिरची कांडप, संपुर्ण गावात स्पिकर, सार्वजनिक पाणीपुरवठा नियोजन, दरगाह सुशोभीकरण, मुख्य रस्ता, दुभाजकांची स्वच्छता, स्मशानभुमी मध्ये रस्ता व निवारा शेड, अल्पसंख्यांक वस्तीतील रस्ते, अल्पसंख्याकसह सुतार समाज सार्वजनिक सभागृह, कचरा उचलणे ट्रॅक्टर व वृक्षलागवडी साठी टॅंकर आदी उपक्रम राबविण्यात आले. सरपंच बाबु खंदाडे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे झाली आहेत. गंगापुर ला ८४ गुण तर निवळीला ८२ गुण मिळाले आहेत. तर कव्हा ग्रामपंचायतील ७६ गुण मिळवुन तिसरा स्थानावर आहे. सरपंच बाबु खंदाडे, उपसरपंच रफीक शेख, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब मिंड, ईश्वर शेलार, रेणुकाताई वाघमारे, शोभाताई बनसोडे, गुणवंत वाघे, सतिष कानडे, उषाताई गायकवाड, फरजानबी शेख, काशीबाई लष्कर, जन्नतबी पठाण, जे. जी. चिवडे आणि ग्रामस्थांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने प्रथम क्रंमाक पटकावला आहे.
जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी मेहनत...
तालूक्यात प्रथम आल्यानंतर जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी ग्रामपंचायत मेहनत घेत आहे. दरम्यान या यशाबद्दल तंटामक्ती अध्यक्ष सुधाकरराव शिंदे, शितलताई शिंदे, सुनिल राऊत, महेश गोरे, किसन तळेकर, महेबुब शेख, विकास गायकवाड, गोविंद चिवडे, शिवाजी नाथबोणे, शिवसागर देशमाने, ग्रामविकास अधिकारी राजश्री परचंडराव, डॉ. प्रताप इगे, चेअरमन हणमंतराव खंदाडे, सुग्रीव वाघे, अरविंद सुरकुटे, गोरोबा फुटाणे, चाॅंद शेख, सतिष धोत्रे, सिंकदर शेख, सुजित वाघे, विनोद दंडीमे, प्रल्हाद गायकवाड, मंगेश खंदाडे, विष्णु वाघमारे, आण्णासाहेब शिंदे, बाबुलाल शेख, प्रभाकर तळेकर, आकाश कुकडे आदींनी कौतूक केले आहे.