आषाढीवारीत गेलेल्या शेतकरी दांपत्याच्या घराला आग

By संदीप शिंदे | Updated: June 24, 2023 20:25 IST2023-06-24T20:23:46+5:302023-06-24T20:25:55+5:30

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आषाढीवारीसाठी विठ्ठल नामाचा जयघोष करीत शेतकरी दांपत्य वारीमध्ये सहभागी झाले

Fire at the house of a farmer couple who went to Ashadhiwari | आषाढीवारीत गेलेल्या शेतकरी दांपत्याच्या घराला आग

आषाढीवारीत गेलेल्या शेतकरी दांपत्याच्या घराला आग

चाकूर : तालुक्यातील उजळंब येथील एका घरास शार्टसर्किट होऊन आग लागली. यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे संसार उघड्यावर पडला असून, ग्रामस्थांतुन हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, आ. बाबासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचा पंचनामा करून तातडीने मदत देण्याचे प्रशासनास आदेश दिले आहेत.

उजळंब येथील भगवान देवराव जाधव आणि पत्नी विजयाबाई भगवान जाधव हे गेली अनेक वर्षापासून आळंदी पंढरपुरची आषाढी पायी वारी न चुकता करणारे दाम्पत्य आहे. प्रतिवर्षाप्रमाणे ते यंदाही आषाढीवारीसाठी विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारीमध्ये सहभागी झाले होते. 

परंतु, शार्टसर्किट होऊन त्यांचे राहते घर तसेच घरातील रोकड, सोने, कपडे, भांडी, धान्य, खरीप हंगामासाठीचे खत-बियाणे यासह सर्वच वस्तु जळून खाक झाले. याबाबत आ. बाबासाहेब पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी संबंधित घरी भेट देऊन पाहणी करीत आर्थिक मदत केली. तसेच तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, असे आदेश महसुल प्रशासनास दिले आहेत.

Web Title: Fire at the house of a farmer couple who went to Ashadhiwari