शासनाने ठरविलेल्या किमतीत खत, बियाणे विक्री करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:21 IST2021-05-21T04:21:03+5:302021-05-21T04:21:03+5:30
सध्या खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. शेतकरी बाजारातून खत व बियाणे खरेदी करण्यासाठी कर्ज घेत आहेत. मात्र अगोदरच ...

शासनाने ठरविलेल्या किमतीत खत, बियाणे विक्री करावी
सध्या खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. शेतकरी बाजारातून खत व बियाणे खरेदी करण्यासाठी कर्ज घेत आहेत. मात्र अगोदरच संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना बाजारात बेभाव खत व बियाणे विक्री होत आहे. खत खरेदी करणा-या शेतकऱ्यांचा अंगठा घेणे आवश्यक आहे. मात्र तो घेतला जात नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतक-यांची लूट होत आहे. ती रोखण्यासाठी खत विक्री करणा-या दुकानांच्या दर्शनी भागावर शासनाने ठरवून दिलेल्या किमतीचे फलक लावून विक्री करावी, असे आदेश द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, पांडुरंग बिरादार, श्रीमंत सोनाळे, विष्णुकांत चिंतलवार, अनिल मोरे, प्रा. सचिन साबणे, कैलास पाटील, ब्रम्हचारी केंद्रे, व्यंकट साबणे, अर्जुन आटोळकर, ॲड. रामदास काकडे, विक्की गवारे, अरुण बिरादार, संजय तावळगे, सचिन पाटील आदींच्या स्वाक्ष-या आहेत.