काैटुंबिक वादातून मुलाकडून बापाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:24+5:302021-06-27T04:14:24+5:30

पाेलिसांनी सांगितले, मयत दिलीप भाऊराव कांबळे (५९ रा. बोधे नगर, लातूर) हे माेलमजुरी करत आपला उदरनिर्वाह भागवित हाेते. त्यांना ...

Father murdered by son over family dispute | काैटुंबिक वादातून मुलाकडून बापाचा खून

काैटुंबिक वादातून मुलाकडून बापाचा खून

पाेलिसांनी सांगितले, मयत दिलीप भाऊराव कांबळे (५९ रा. बोधे नगर, लातूर) हे माेलमजुरी करत आपला उदरनिर्वाह भागवित हाेते. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा असे आपत्य आहेत. तीनही मुलींची लग्न झाली आहेत. दरम्यान, एकुलत्या एक मुलगा मंगेश (२२) आणि वडील दिलीप कांबळे यांच्यामध्ये सतत काैटुंबिक वाद होत असत. शुक्रवारी रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास दाेघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचे पर्यवसान मुलाने केलेल्या मारहाणीत झाले. मुलगा मंगेश कांबळे याने आपल्या जन्मदात्या बापाच्या डाेक्यात फावडे घातले. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती शिवाजीनगर पाेलिसांना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास समजली. घटनास्थळी पाेलिसांनी भेट देत पंचनामा केला असून, आराेपी मुलाला अटक करण्यात आली आहे. मंगेश कांबळे याने आपल्या बापाचा खून का केला, हे कारण मात्र अद्याप समाेर आले नाही.

याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड करीत आहेत.

Web Title: Father murdered by son over family dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.