दररोज १०० ते १५० जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:20 IST2021-07-29T04:20:54+5:302021-07-29T04:20:54+5:30
गरीब व गरजूंना स्वस्तात भोजन मिळावे, याकरिता २६ जानेवारी २०२० पासून राज्यभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी सुरू ...

दररोज १०० ते १५० जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही!
गरीब व गरजूंना स्वस्तात भोजन मिळावे, याकरिता २६ जानेवारी २०२० पासून राज्यभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी सुरू केली आहे. जिल्ह्यात प्रथम प्रायोगिक तत्त्वावर केंद्र सुरू करण्यात आले. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता, केंद्राची संख्या वाढविण्यात आली. सध्या जिल्ह्यात केंद्राची संख्या २५ इतकी झाली आहे. कोरोनाकाळात शेतमजूर, गरजूंना थाळीचा आधार मिळत आहे. केंद्रास निश्चित केलेल्या थाळीची संख्या १५ एप्रिलपासून दीडपट वाढविण्यात आली आहे. त्यासोबतच वेळही वाढविण्यात आला आहे. सकाळी ११ दुपारी ४ वाजेपर्यंत नागरिकांना थाळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, दुपारी २ वाजेपर्यंतच कोटा संपत असल्याने १०० ते १५० नागरिकांना रिकाम्या हाताने परवावे लागत आहे.
पॉइंटर...
जिल्ह्यातील एकूण शिवभाेजन केंद्रे २५
रोजच्या थाळी लाभार्थींची संख्या ३०००
शहरातील एकूण शिवभाेजन केंद्र १०
शहरातील रोज लाभार्थींची संख्या १५००
रोज १०० ते १५० उपाशी
शहरातील शिवभोजन थाळी केंद्रात थाळीचे उद्दिष्ट आहे. १५ एप्रिलपासून इष्टांक वाढविण्यात आला, त्यामुळे थाळींची संख्या १५० करण्यात आली आहे. असे असले तरी, दुपारी १.३० वाजेपर्यंत थाळी संपत असल्याने दररोज १०० ते १५० व्यक्तींना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
अहमदपूर केंद्र : अहमदपूर शहर परिसरात शिवभाेजन केंद्र आहे. या केंद्राला १०० लाभार्थींचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. सध्या इष्टांक वाढविण्यात आला असल्याने १५० थाळ्या झाल्या आहेत. या केंद्रावर नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र, थाळी कमी पडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
बाकीच्यांचे काय?
जिल्ह्यात नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता, केंद्रे वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे आता केंद्रांची संख्या २५ झाली आहे. या सर्वच केंद्रांवर दररोज दोन हजाराहून अधिकजणांचे पोट भरत आहे. मात्र इतर व्यक्तींना वंचित राहावे लागत आहे.