धनेगावजवळ ट्रक-कारचा भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चार व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू
By संदीप शिंदे | Updated: April 10, 2024 14:50 IST2024-04-10T14:49:52+5:302024-04-10T14:50:54+5:30
अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला असून, जेसीबीच्या मदतीने कार काढण्यात आली.

धनेगावजवळ ट्रक-कारचा भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चार व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू
वलांडी (जि.लातूर) : उदगीर-निलंगा राज्य मार्गावरील धनेगावजवळ बुधवारी दुपारी ट्रक व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले असून,मयत हे मध्यप्रदेशातील इंदौर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
वलांडीहून कार क्रमांक (एम.पी. ०९ डी.ई. ५२२७) ही निलंग्याकडे जात असताना समोरून येणारा ट्रक क्रमांक (एम.एच. २५ जे. ७३६५) यांची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यु झाला आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला असून, जेसीबीच्या मदतीने कार काढण्यात आली. घटनास्थळी देवणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके व सहकाऱ्यांनी भेट देऊन मृतदेह वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. मयताच्या ओळखीचे प्रयत्न पोलिसांकडुन सुरू आहेत.