Farmers: 1578 farmers do not get loan waiver due to lack of support | Farmers : केवळ आधार नसल्याने १५७८ शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

Farmers : केवळ आधार नसल्याने १५७८ शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

लातूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने राबवलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत लातूर जिल्ह्यात ६५ हजार ७७० शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असून, यापैकी ५७ हजार ३३८ जणांना ३३८ कोटी २७ लाख रुपयांची कर्जामाफी मिळालेली आहे. केवळ  आधार प्रमाणीकरण नसल्याने १ हजार ५७८ शेतकऱ्याना कर्जमाफी मिळालेली नाही..
शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती. यामध्ये सुमारे दीड हजार शेतकरी योजनेपासून वंचित आहेत. परिणामी, या शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामाच्या पीक कर्जापासून वंचित राहावे लागले आहे. 

Web Title: Farmers: 1578 farmers do not get loan waiver due to lack of support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.