वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By हरी मोकाशे | Updated: June 23, 2024 21:12 IST2024-06-23T21:12:36+5:302024-06-23T21:12:51+5:30
दोन- तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला.

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
औसा (जि. लातूर) : औसा शहरासह तालुक्यात रविवारी दुपारपासून सर्वदूर पाऊस झाला. पावसामुळे हासेगाववाडी शिवारात झाडाखाली बसलेल्या दोन शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले.
दोन- तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला. दरम्यान, तालुक्यातील हसेगाववाडी येथील दोन शेतकरी झाडाच्या आसऱ्यासाठी बसले होते. तेव्हा वीज कोसळली. यात श्रीपती आत्माराम मदने (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबतच्या शेतकरी महादेव प्रकाश मुगळे (वय ३८) हे गंभीर जखमी झाले. या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. मुख्य बाजारपेठेतील रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. बाजाराचा दिवस असल्याने चिखल, पाण्यातून नागरिक ये- जा करीत होते.